मुंबई, 6 मार्च : भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत येत असतो. अशातच आता हार्दिक पांड्याने इंस्टाग्राम फॉलोवर्सच्या बाबतीत भल्याभल्यांचे रेकॉर्ड तोडले आहेत. हार्दिकने नुकताच इंस्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा गाठला असून यासोबतच त्याने एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
Suryakumar Yadav : मुंबईच्या रस्त्यावर सूर्याचा हटके अंदाज, दाखवली त्याच्या खास शॉटची झलक
हार्दिक पांड्या हा आपल्या सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह राहून आपल्या चाहत्यांना तो स्वतःच्या जीवनाविषयी विविध अपडेट्स देत असतो. अशातच हार्दिक गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात रोमांचक व्यक्तिमत्व म्हणून उदयास आला आहे. यामुळे हार्दिकला फॉलो करणाऱ्यांची संख्या 25 मिलियनपर्यंत पोहिचली असून तो इंस्टाग्रामवर 25 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा जगातील सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.
View this post on Instagram
राफेल नदाल, रॉजर फेडरर, मॅक्स वर्स्टॅपेन आणि एर्लिंग हॅलँड यांसारख्या जागतिक क्रीडा क्षेत्रातील स्टार खेळाडूंपेक्षा हार्दिकचे इंस्टाग्राम फॉलोअर्स जास्त आहेत. 25 मिलियन फॉलोवर्स पूर्ण केल्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, "इतकं प्रेम दिल्याबद्दल माझ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. माझा प्रत्येक चाहता माझ्यासाठी खास आहे आणि या सगळ्यावर त्यांनी मला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो".
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Hardik pandya, Instagram