मुंबई, 15 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ICC टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 टीम सहभागी होत आहेत. टूर्नानेंटसाठी भारतीय टीम सज्ज झाली आहे. टीममधील ऑल राउंडर खेळाडू हार्दिक पंड्या व ऋषभ पंत या टूर्नानेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील असं एका माजी खेळाडूला वाटतंय. ऑल राउंडर रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे टीमबाहेर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात उत्तम कामगिरी करणारा पंत आणि पंड्या हे दोघे भारतीय टीममधील ‘एक्स फॅक्टर’ असतील, असं सुरेश रैनाला वाटतंय. विशेष म्हणजे, एकेकाळी युवराज आणि रैनाने माजी कॅप्टन एमएस धोनीसोबत मिळून जशी कामगिरी केली होतील, तशीच कामगिरी पुन्हा हे दोघं आताच्या कॅप्टनसोबत करू शकतात, अशी शक्यताही रैनाने वर्तवली आहे. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने 2007 मध्ये सुरुवातीच्या वर्ल्ड टी-20, 2011 वन-डे वर्ल्ड कप आणि 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (टीम इंडियाने जिंकलेली शेवटची ICC टूर्नामेंट) विजेतेपद पटकावलं होतं. (13 चौकार, 9 सिक्स अन् 134 रन्स, पृथ्वी शॉची तडाखेबाज खेळी!) रैनाने शुक्रवारी सांगितलं, “माझ्या मते मधल्या फळीत लेफ्ट हँड बॅट्समन टीममध्ये असणं खूप महत्त्वाचं असेल. एक ते सहाव्या क्रमांकापर्यंत आपल्याकडे लेफ्ट हँड बॅट्समन नाही आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे दोन-तीन लेफ्ट हँड बॉलर्स असतील, असा मला विश्वास आहे. आम्ही हे यापूर्वी (2007, 2011 आणि 2013) पाहिलंय, ज्यात गौतम गंभीर, युवराजसिंग आणि मी महत्त्वाची भूमिका बजावली होती.” विकेटकीपर बॅट्समन म्हणून भारताने दिनेश कार्तिकपेक्षा पंतला प्राधान्य द्यावे की नाही, असं विचारलं असता रैना म्हणाला, “तुम्हाला हार्दिकसोबत ‘एक्स फॅक्टर’ आणावा लागेल आणि हा ‘एक्स फॅक्टर’ कोण असू शकतो. मला वाटतं की ऋषभ पंत लेफ्ट हँड बॅट्समन म्हणून चांगली कामगिरी करू शकतो. कारण जेव्हा मी आणि युवराज खेळायचो तेव्हा आणि प्रतिस्पर्ध्यांना घाबरवायचो. आता रोहित आणि राहुलने ते कोणाला निवडणार याचा निर्णय घ्यायला हवा. मला पूर्ण विश्वास आहे, की ते याचा विचार करतील. पण शेवटी कोणीही खेळू देत, आपल्यासाठी जिंकणं महत्त्वाचं आहे.”कार्तिक टीमचा ‘फिनिशर’ आहे, पण भारत प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन्ही विकेटकीपर बॅट्समनना मैदानात उतरवण्याची शक्यता दिसत नाहीये. ( 16 टीम, 45 सामने, एक ट्रॉफी; पाहा भारतात किती वाजता सुरु होणार वर्ल्ड कप सामने? ) खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू रैना म्हणाला, “डीके (दिनेश कार्तिक) जवळ चांगली संधी आहे, त्याला महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. पण त्यांनी कार्तिकपेक्षा पंतला प्राधान्य द्यायला हवं, असं माझं म्हणणं नाही. ज्याला संधी मिळेल, त्याने आपली जबाबदारी पार पाडत मॅच जिंकून द्यावी,” असं रैनाने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.