जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Harbhajan Singh ची नवी इनिंग, AAP कडून राज्यसभेत जाणार!

Harbhajan Singh ची नवी इनिंग, AAP कडून राज्यसभेत जाणार!

Harbhajan Singh ची नवी इनिंग, AAP कडून राज्यसभेत जाणार!

क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh) लवकरच त्याच्या नव्या इनिंगला सुरूवात करू शकतो. आम आदमी पक्ष (AAP) हरभजन सिंगला राज्यसभेमध्ये (Rajya Sabha) पाठवण्याच्या विचारात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंडीगढ, 16 मार्च : क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh) लवकरच त्याच्या नव्या इनिंगला सुरूवात करू शकतो. आम आदमी पक्ष (AAP) हरभजन सिंगला राज्यसभेमध्ये (Rajya Sabha) पाठवण्याच्या विचारात आहे. याशिवाय त्याला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची जबाबदारीही सोपवली जाऊ शकते. भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच हे वृत्त समोर आलं आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळालं. पंजाबमध्ये बहुमत मिळाल्यामुळे आपच्या भगवंत मान यांनी आजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. निवडणूक प्रचारावेळीच भगवंत मान यांनी सरकार आलं तर खेळाला प्राधान्य दिलं जाईल, अशी घोषणा केली होती. तसंच जलंधरमध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीही उघडली जाईल, असं सांगितलं होतं. आता हरभजनला राज्यसभेवर पाठवलं गेलं आणि त्याच्याकडे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची जबाबदारी दिली तर आपकडून संदेश दिला जाईल. या महिन्याच्या शेवटी राज्यसभेसाठी आम आदमी पक्षाला पाच जागा मिळणार आहेत. यातलं पहिलं नाव हरभजन सिंगचं असू शकतं. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही हरभजनच्या नावाला हिरवा कंदील दिला आहे. लवकरच याची घोषणा व्हायचीही शक्यता आहे. भगवंत मान आणि हरभजन सिंग जवळचे मित्र आहेत. जेव्हा पंजाबमध्ये आपचा विजय झाला तेव्हा हरभजन सिंगने ट्वीट करून भगवंत मान यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आपचं अभिनंदन मुख्यमंत्री होणाऱ्या माझ्या मित्राला भगवंत मानला शुभेच्छा, असं ट्वीट हरभजनने केलं होतं. जेव्हापासून स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी बनवण्याबाबत बोलणं सुरू झालं तेव्हापासूनच हरभजन सिंगचं नाव घेतलं जाऊ लागलं होतं. दिल्लीनंतर सत्ता येणारं पंजाब हे आपचं दुसरं राज्य आहे. पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागांवर आपचा विजय झाला. आप उमेदवारांनी पंजाबच्या दिग्गजांना धूळ चारली. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन्ही जागांवरून तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंग सिद्धूही आप उमेदवारासमोर पराभूत झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात