Home /News /sport /

England vs West Indies: कोरोनाच्या संकटात आजपासून सुरू होणार पहिला क्रिकेट सामना, असे असतील 10 नियम

England vs West Indies: कोरोनाच्या संकटात आजपासून सुरू होणार पहिला क्रिकेट सामना, असे असतील 10 नियम

जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. अखेर, चार महिन्यांच्या कालावधीनंतर लाइव्ह क्रिकेटचा अनुभव चाहत्यांना घेता येणार आहे.

    साउथहँप्टन, 08 जुलै : साऱ्या जगात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे जवळजवळ सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत. क्रिकेट जगतालाही याचा फटका बसला. अखेर आजपासून कोरोनाच्या संकटात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. अखेर, चार महिन्यांच्या कालावधीनंतर लाइव्ह क्रिकेटचा अनुभव चाहत्यांना घेता येणार आहे. कोरोनाच्या संकटात आजपासून इंग्लड-वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका ऐतिहासिक मानली जात आहे, कारण कोरोनाच्या संकटातही वेस्ट इंडिजचे खेळाडू या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाले. मात्र हा सामना पहिल्यासारखा नसेल. या सामन्यात 10 मुख्य बदल केले गेले आहेत. 1. रिकामे स्टेडियम कोरोनाव्हायरस हा एका माणसकडून दुसऱ्याकडे लगेच पसरला जातो. त्यामुळेच हा आतंरराष्ट्रीय सामना प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजेच स्टेडियमवर प्रेक्षक नसतील. हा निर्णय कोरोनाचे संक्रमण होऊ नये या दृष्टीने घेण्यात आला आहे. 2. ठिकठिकाणी सॅनिटायझर दुसरा मोठा बदल म्हणजे स्टेडियमवर ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. जेथे वेळोवेळी खेळाडू आपल्या हात सॅनिटाइज करतील. खेळाडूंना सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. 3. खेळाडू एकत्र येऊन आनंद साजरा करणार नाहीत क्रिकेटच्या सामन्यात कायम पाहिले जाते की, गोलंदाजनं विकेट घेतल्यानंतर खेळाडू मैदानावर एकत्र जमतात. एकमेकांना टाळ्या देतात, मिठ्या मारतात. मात्र आता असे करता येणार नाही. खेळाडूंना मिठी किंवा एकत्र येण्यास सक्त मनाई आहे. खेळाडू एकमेकांना एल्बो टच करू शकतात. 4. दर्शकांचा आवाज आणि टीव्ही स्क्रीन हा सामना दर्शकांशिवाय असला तरी, खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात फेक क्राउज नॉइद असेल. याशिवाय मैदानात मोठ मोठ्य स्क्रीन लावण्यात येणार आहे. याच्या मदतीनं लाईव्ह व्हूचा आनंद घेता येईल. 5. चेंडूवर नाही लावता येणार थूक क्रिकेटमधला सगळ्यात मोठा बदल म्हणजे गोलंदाजानं चेंडू चमकवण्यासाठी आता थूक लावता येणार नाही. जर खेळाडू असे करतील तर त्यांना ताकीद देण्यात येईल. सतत असे झाल्यास खेळाडूंना दंडही भरावा लागेल. खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी आपल्या घामाचा वापर करू शकतात. 6. कोरोना सबस्टिट्युट वर्ल्ड कप 2019मध्ये आयसीसीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. यात कोणताही खेळाडू सामना सुरू असताना जखमी झाल्यास, त्याच्या जागी दुसरा खेळाडू सामना खेळू शकतो. मात्र आता कोरोनामुळं या नियमात थोडा बदल करण्यात आला आहे. जर खेळाडूमध्ये कोणताही लक्षणं दिसली तर, त्याच्या जागी लगेचच दुसरा खेळाडू मैदानात उतरेल. 7. आयसीसीची वॉर्निंग मैदानावर प्रेक्षकांचा आवाज नसेल, मात्र स्टम्प माइक असतील. यातून खेळाडू पंचांचा आवाज ऐकू शकतील. आयसीसीच्या वतीनं सतत वॉर्निंग दिली जाईल. यातमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर खेळाडूंनी करू नये, असे सांगण्यात येईल. 8. सॅनिटाइज केलेले वातावरण कोरोनाच्या संकटात पहिला सामना खेळाडू एका इतिहास तर रचला जाईलच मात्र याचबरोबर खेळाडूंची काळजीही घेतली जाणार आहे. संपूर्ण वातावरण सामना सुरू होण्याआधी सॅनिटाइज केले जाणार आहे. तसेच खेळाडूंना केवळ हॉटेल ते स्टेडियम एवढाच प्रवास करण्याची परवानगी असेल. 9. लोकल पंच या सामन्यात सर्व पंच हे लोकल पंच असतील. कारण इतर देशातून पंचांना बोलवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळं आयसीसीच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. 10. टीशर्टच्या समोर असेल लोगो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये आयसीसीनं खेळाडूंना टीशर्टच्या मागे नाव छापण्याची परवानगी दिली होती. मात्र पुढील एक वर्ष सफेद जर्सीच्या पुढील बाजूस नाव, नंबर आणि लोगो असेल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या