जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / इंग्लंडच्या फास्ट बॉलरचा हार्ट अटॅकने मृत्यू, करियरमध्ये घेतल्या 560 विकेट

इंग्लंडच्या फास्ट बॉलरचा हार्ट अटॅकने मृत्यू, करियरमध्ये घेतल्या 560 विकेट

इंग्लंडच्या फास्ट बॉलरचा हार्ट अटॅकने मृत्यू, करियरमध्ये घेतल्या 560 विकेट

इंग्लंडचे माजी फास्ट बॉलर जो बेंजामिन (Joey Benjamin) यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे, ते 60 वर्षांचे होते. इंग्लंडच्या सरेमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मार्च : इंग्लंडचे माजी फास्ट बॉलर जो बेंजामिन (Joey Benjamin) यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे, ते 60 वर्षांचे होते. इंग्लंडच्या सरेमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 33 व्या वर्षी 1994 साली त्यांनी इंग्लंडसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याचवर्षी त्यांना वनडे टीममध्येही संधी देण्यात आली होती. बेंजामिन यांचं आंतरराष्ट्रीय करियर फार चाललं नाही, पण काऊंटी क्रिकेटमध्ये ते बराच काळ खेळले आणि अनेक विकेट घेतल्या. सरे क्रिकेट क्लबने मंगळवारी रात्री त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बेंजामिन यांच्या निधनाचं वृत्त दिलं. बेंजामिन यांचा जन्न 1961 साली कॅरेबियन बेट असलेल्या सेंट किट्समध्ये झाला होता. 15 व्या वर्षी ते कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये आले. यानंतर त्यांनी वार्विकशायर काऊंटीकडून खेळताना आपल्या क्रिकेट करियरची सुरूवात केली. बेंजामिन यांना वयाच्या 27व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. वार्विकशायरकडून त्यांनी 1988 साली करियरची सुरूवात केली, पण त्यांना फार यश मिळालं नाही. यानंतर 1992 साली ते सरेकडून खेळायला लागले. इकडूनच त्यांच्या करियरने झेप घेतली आणि त्यांना इंग्लंडच्या टीममध्ये स्थान मिळालं.

News18

1994 साली वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं. लंडनच्या ओव्हलमध्ये आपल्या घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये त्यांनी पहिल्या इनिंगमध्येच त्यांनी 4 विकेट घेतल्या. यामध्ये केपलर वेसल्स आणि हॅन्सी क्रोनिये यांच्यासारख्या मोठ्या बॅट्समनचा समावेश होता. पण यानंतर त्यांना टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी वनडे क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. पण दोन मॅचमध्ये त्यांना फक्त एक विकेट मिळाली आणि त्यांना मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. एका वर्षात घेतल्या 80 विकेट काऊंटी क्रिकेटमध्ये मात्र त्यांनी खोऱ्याने विकेट घेतल्या. 1992 साली सरेमध्ये आल्यानंतर त्यांना जबरदस्त यश मिळालं. 1992 सालच्या मोसमात त्यांनी 64 विकेट घेतल्या. यानंतर 1994 साली त्यांनी 20.7 च्या सरासरीने एकाच वर्षात तब्बल 80 विकेट घेतल्या. प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये मिळून त्यांनी 560 विकेट स्वत:च्या नावावर केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात