मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /इंग्लंडचा खेळाडू भलताच घाबरला, टीममध्ये निवड होताच...

इंग्लंडचा खेळाडू भलताच घाबरला, टीममध्ये निवड होताच...

इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिनसन (Ollie Robinson) याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आलं आहे, त्यामुळे इंग्लंडच्या इतर खेळाडूंमध्येही भीतीचं वातावरण आहे.

लंडन, 7 जून : इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिनसन (Ollie Robinson) याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आलं आहे, त्यामुळे इंग्लंडच्या इतर खेळाडूंमध्येही भीतीचं वातावरण आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी (England vs New Zealand) ऑफ स्पिनर डॉम बेस (Dom Bess) याची निवड झाली आहे, पण ही निवड होताच बेसने त्याचं ट्विटर अकाऊंट बंद करून टाकलं आहे. बेसची सोमवारी इंग्लंडच्या टीममध्ये निवड झाल्यानंतर चाहत्यांनी त्याचं ट्विटर अकाऊंट पाहायचा प्रयत्न केला, पण त्याचं ट्विटर अकाऊंट बंद असल्याचं दिसलं.

ओली रॉबिनसन याने 8 वर्षांपूर्वी केलेलं वर्णद्वेषी आणि लिंगभेदी ट्वीट त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून पदार्पण केल्यामुळे चर्चेत आलं. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले, ही चौकशी पूर्ण होईपर्यंत ओली रॉबिनसन याचं निलंबन करण्यात आलं आहे. पण डॉम बेस याने त्याचं ट्विटर अकाऊंट का बंद केलं, याबाबत मात्र अजून माहिती मिळू शकली नाही.

ओली रॉबिनसन याचं निलंबन केल्यामुळे इंग्लंडमध्ये मात्र राजकारण तापलं आहे. इंग्लंडचे क्रीडा मंत्री ओलिव्हर डाऊडेन (Oliver Dowden) यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डावर टीका केली. बोर्डाने या प्रकरणात जास्तच कठोर भूमिका घेतल्याचा आरोप डाऊडेन यांनी केला. तर इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन  (PM Boris Johnson) यांनीही डाऊडेन यांचं समर्थन केलं आहे.

ओली रॉबिनसनने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. या सामन्यात त्याने एकूण 7 विकेट घेतल्या, यामध्ये केन विलियमसन आणि रॉस टेलर यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली ही टेस्ट ड्रॉ झाली.

First published:

Tags: Cricket, England