मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /बेन स्टोक्सचा इंग्लंडला 440 व्होल्टचा करंट, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

बेन स्टोक्सचा इंग्लंडला 440 व्होल्टचा करंट, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stokes Retirement) वनडे क्रिकेटमधून (ODI Cricket) संन्यास घेतला आहे. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार आहे. वनडेमधून निवृत्ती घेतली असली तरी तो टी-20 आणि टेस्ट क्रिकेट खेळणार आहे.

पुढे वाचा ...

लंडन, 18 जुलै : इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stokes Retirement) वनडे क्रिकेटमधून (ODI Cricket) संन्यास घेतला आहे. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार आहे. वनडेमधून निवृत्ती घेतली असली तरी तो टी-20 आणि टेस्ट क्रिकेट खेळणार आहे. स्टोक्स त्याची शेवटची वनडे मंगळवार 19 जुलैला आपलं होम ग्राऊंड डरहममध्ये खेळणार आहे. इंग्लंडचा हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. स्टोक्स इंग्लंडकडून 104 वनडे खेळला आहे. 2019 साली इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा फायनलमध्ये स्टोक्सला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

स्टोक्सने त्याच्या निवृत्तीची घोषणा सोशल मीडियावर केली. 'मी इंग्लंडकडून वनडे क्रिकेटमध्ये शेवटचा सामना मंगळवारी डरहममध्ये खेळणार आहे. मी या फॉरमॅटमधून संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी हा निर्णय कठीण होता. इंग्लंडकडून आपल्या सहकाऱ्यांसोबत खेळताना मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. माझ्यासाठी हा प्रवास शानदार होता. या फॉरमॅटमध्ये आता मी कदाचित 100 टक्के योगदान देऊ शकणार नाही. मी आता तिन्ही फॉरमॅटमध्ये तेवढं चांगलं क्रिकेट खेळू शकणार नाही, त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे,' असं स्टोक्स त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला.

'फक्त वर्कलोड वाढत आहे म्हणून नाही तर मी एका युवा खेळाडूची जागा घेत आहे, जो इंग्लंडसाठी आणखी योगदान देऊ शकतो, असं मला वाटलं. मी टेस्ट क्रिकेटला सगळं काही देणार आहे. या निर्णयामुळे मी टी-20 फॉरमॅटमध्येही माझं सर्वोत्तम देऊ शकतो. मी जॉस बटलर, मॅथ्यू मॉट, खेळाडू आणि सहकारी स्टाफला भविष्यातल्या यशासाठी शुभेच्छा देतो. आम्ही मागच्या 7 वर्षांमध्ये पांढऱ्या बॉलच्या क्रिकेटमध्ये खूप प्रगती केली आहे आणि भविष्यही उज्ज्वल दिसत आहे,' असंही स्टोक्सने त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं.

इंग्लंडला 2019 साली वर्ल्ड कप जिंकवून देण्यात स्टोक्सची भूमिका महत्त्वाची होती. 2019 वर्ल्ड कपमध्ये त्याने 66.42 च्या सरासरीने 465 रन केले. फायनलमध्येही त्याने 84 रनची आक्रमक खेळी केली, ज्यामुळे इंग्लंडला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकता आला. याशिवाय स्टोक्सने 2019 वर्ल्ड कपमध्ये 7 विकेटही घेतल्या.

स्टोक्सचं वनडे करियर

स्टोक्सने 20व्या वर्षी 2011 साली आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून इंग्लंडकडून पदार्पण केलं. 31 वर्षांच्या स्टोक्सने वनडे करियरमध्ये फक्त 104 सामन्यांमध्ये भाग घेतला. वनडेमध्ये त्याने 40 च्या सरासरीने 2919 रन केले, यात त्याच्या नावावर 3 शतकं आणि 21 अर्धशतकं आहेत. तसंच त्याने 74 विकेटही घेतल्या.

First published:
top videos

    Tags: Ben stokes, England