Home /News /sport /

ENG vs PAK: गळ्यातल्या लॉकेटमुळे पाकिस्तानचा हसन अली पुन्हा चर्चेत

ENG vs PAK: गळ्यातल्या लॉकेटमुळे पाकिस्तानचा हसन अली पुन्हा चर्चेत

पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) हा कायमच क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही चर्चेत असतो. वाघा बॉर्डरवर केलेल्या आक्षेपार्ह कृतीमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.

    लंडन, 12 जुलै: पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) हा कायमच क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही चर्चेत असतो. वाघा बॉर्डरवर केलेल्या आक्षेपार्ह कृतीमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. तसंच भारतातल्या मुलीसोबत लग्न केल्यामुळेही हसन अली चर्चेत आला होता. विकेट घेतल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनमुळे हसन अलीला दुखापतग्रस्त व्हायची वेळही आली होती. आता हसन अली त्याच्या याच सेलिब्रेशनमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हसन अलीने तो ज्या स्टाईलने सेलिब्रेशन करतो, अगदी तशाच स्टाईलचं लॉकेट गळ्यात घातलं होतं. लॉर्ड्स वनडे दरम्यान चाहत्यांची नजर या लॉकेटवर पडली. हसन अलीने इंग्लंडविरुद्धच्या (England vs Pakistan) दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडविरुद्ध 5 विकेट घेतल्या. 9.1 ओव्हर बॉलिंग करून त्याने 51 रन दिल्या. हसन अलीच्या या बॉलिंगमुळे इंग्लंडचा 248 रनवर ऑल आऊट झाला, पण पाकिस्तानला या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. या सामन्यात पाकिस्तानचा 195 रनवर ऑल आऊट झाला आणि त्यांना 52 रननी पराभव स्वीकारावा लागला. याचसोबत पाकिस्तानने ही सीरिजही गमावली. या मॅचनंतर हसन अलीच्या लॉकेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. इंग्लंडची इनिंग संपल्यानंतर हसन अली कॅमेरासमोर बोलत होता, तेव्हा चाहत्यांना त्याचं लॉकेट दिसलं. 27 वर्षांच्या हसनने आपल्या करियरमध्ये 13 टेस्ट, 56 वनडे आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. त्याच्या नावावर टेस्टमध्ये 57, वनडेमध्ये 88 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्यें 48 विकेट आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, England, Pakistan

    पुढील बातम्या