लंडन, 6 जुलै: इंग्लंड टीमने पाकिस्तानविरुद्धच्या (England vs Pakistan) सीरिजसाठी 18 सदस्यांच्या नव्या टीमची घोषणा केली आहे. बेन स्टोक्सला (Ben Stokes) या टीमचा कर्णधार करण्यात आलं आहे. पहिले घोषित केलेल्या कोणत्याही खेळाडूला नव्या टीममध्ये जागा देण्यात आलेली नाही. इंग्लंड टीममधल्या 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे सगळ्यांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातली 3 वनडे मॅचची सीरिज 8 जुलैपासून सुरू होणार आहे.
नव्या खेळाडूंना ही मोठी संधी आहे, कारण 24 तास आधी त्यांना एवढ्या मोठ्या सामन्यात खेळण्याची संधी नव्हती, अशी प्रतिक्रिया इंग्लंड क्रिकेटचे मॅनेजिंग डायरेक्टर एश्ले जाईल्स यांनी दिली. स्थानिक क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कठीण काळात पाकिस्तान बोर्डाचे आम्ही आभार मानतो, असं जाईल्स म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंड टीमचा ओपनर, एक लेग स्पिनर पॉझिटिव्ह आला आहे, पण बोर्डाने कोणत्याही खेळाडूचं नाव घेतलेलं नाही.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातली वनडे सीरिज 8 जुलै, 10 जुलै आणि 13 जुलैला होतील. तर टी-20 मॅच 16 जुलै, 18 जुलै आणि 20 जुलैला खेळवले जातील. याआधी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये इंग्लंडचा 3-0 ने आणि वनडे सीरिजमध्ये 2-0 ने विजय झाला. वनडे सीरिजची अखेरची मॅच पावसामुळे रद्द झाली. पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजनंतर इंग्लंडची टीम भारताविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होईल. भारतीय टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे.
वनडे सीरिजसाठी इंग्लंडची टीम
बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक बेल, डेनी ब्रिग्स, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉले, बेन डकेट, लुईस जॉर्ज, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, डेविड मलान, साकिब महमूद, क्रेग ओवर्टन, मॅट पार्किनसन, डेविड पेन, फिल सॉल्ट, जॉन सिम्पसन, जेम्स विन्सी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket, Cricket news, England, Pakistan, Sports