मुंबई, 30 ऑगस्ट : टीममधून डच्चू मिळाल्यानंतर देशसेवेसाठी लष्करात गेलेल्या खेळाडूची पुन्हा एकदा राष्ट्रीय टीममध्ये निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी श्रीलंकेने (Sri Lanka vs South Africa) दिनेश चंडीमल (Dinesh Chandimal) याची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सीरिजसाठी श्रीलंकेने 22 खेळाडूंची घोषणा केली आहे. याशिवाय कुसर परेरा (Kusal Parera) याचंही टीममध्ये पुनरागमन झालं आहे. यावर्षी मार्च-एप्रिल महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळल्यानंतर चंडीमल श्रीलंकेकडून खेळलेला नाही. श्रीलंका दौऱ्यात दक्षिण आफ्रिका 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. 2-14 सप्टेंबरदरम्यान या सगळ्या मॅच कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियमवर खेळवल्या जाणार आहेत. टी-20 वर्ल्ड कपआधी या दोन्ही टीमची ही अखेरची सीरिज असणार आहे. 2021 च्या सुरुवातीला दिनेश चंडीमल श्रीलंकेच्या टेस्ट टीमचा कर्णधार होता, पण तीन महिन्यानंतर त्याचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं. एवढच नाही तर त्याला टीममधूनही बाहेर करण्यात आलं. यानंतर त्याच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं. दिनेश चंडीमलने जानेवारी 2021 मध्ये श्रीलंका आर्मी वॉलिंटियर फोर्समध्ये प्रवेश मिळवला. त्याला आर्मीच्या क्रिकेट टीमकडून खेळण्याची ऑफर मिळाली होती, ही ऑफर त्याने स्वीकारली. श्रीलंका टीममधून बाहेर गेल्यानंतर चंडीमल नव्या कामाला लागला. श्रीलंकन लष्करात दिनेश चंडीमलला मेजर रँक मिळाला आहे. लष्कराच्या गणवेशातला त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी चंडीमलला टीममधून बाहेर करण्यात आलं होतं, यानंतर श्रीलंकेचे क्रिकेट चाहते हैराण झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.