मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनीकडे आहे व्हिंटेज आणि स्पोर्ट्स कारचं कलेक्शन; पत्नी साक्षीनं शेअर केला VIDEO

धोनीकडे आहे व्हिंटेज आणि स्पोर्ट्स कारचं कलेक्शन; पत्नी साक्षीनं शेअर केला VIDEO

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) क्रिकेटसाठी (Cricket) जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याच्या कार (Cars) आणि बाईक्सच्या (Bikes) वेडासाठीही प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे बाईक्स आणि व्हिंटेज कारसह स्पोर्ट्स कारचा मोठा संग्रह आहे.

पुढे वाचा ...

रांची, 6 जुलै : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) क्रिकेटसाठी (Cricket) जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याच्या कार (Cars) आणि बाईक्सच्या (Bikes) वेडासाठीही प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे बाईक्स आणि व्हिंटेज कारसह स्पोर्ट्स कारचा मोठा संग्रह आहे. महेंद्रसिंग धोनी बर्‍याचदा रांचीच्या (Ranchi) रस्त्यावर यापैकी एखादे वाहन चालवताना दिसतो. धोनीकडे किती आणि कोणत्या व्हिंटेज, स्पोर्ट्स कार आणि बाईक्स आहेत याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ त्याची पत्नी साक्षीने (Sakshi) इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओतून धोनीच्या या संग्रहाची झलक पाहता येईल.

धोनीनं फार्महाउसवर बांधलं आहे शोरूम 

महेंद्रसिंग धोनीनं आपल्या फार्म हाऊसमध्ये (Farm house) आपल्या कार आणि बाईक्ससाठी एक खास शोरूम (Showroom) बांधलं आहे. ज्यामुळे ही सर्व वाहनं धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतात. यावरून सहज लक्षात येईल की धोनीचं आपल्या कार आणि बाईक्सवर किती प्रेम आहे. तो या सर्व वाहनांची जिवापाड काळजी घेतो.

साक्षीच्या व्हिडिओमध्ये दिसली माहीची कार

महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी हिनं नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन या संग्रहाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत माहीच्या फार्म हाउसवर असलेले कारचे भव्य शोरूम दिसते. एक गवत खात असलेला सुंदरसा घोडाही या व्हिडिओत दिसतो. त्यांनतर एकापेक्षा एक आलिशान कारचा संग्रह दृष्टीला पडतो.

माहीकडे आहेत या अलिशान कार

मीडिया रिपोर्टनुसार, माहीकडे अनेक अलिशान मोटार आहेत. ज्यामध्ये सर्वांत महागडी आणि अलिशान कार आहे पोर्शे 911. या कारची किंमत 2.50 कोटी रुपये आहे. यासह धोनीकडे फेरारी 599 जीटीओ आहे जिची किंमत 1.39 कोटी आहे. या व्यतिरिक्त 2020मध्ये त्याने पाँटियाक फायरबर्ड ट्रान्स एएम ही कार खरेदी केली असून, या कारची किंमत 68 लाख रुपये आहे. यासह, त्याच्याकडे ‘हमर एच 2’ हीदेखील कार आहे. तिची किंमत 72 लाख रुपये आहे. या मोटारींव्यतिरिक्त धोनीच्या गॅरेजमध्ये निसान जोंगा, जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक, लँड रोव्हर फ्रीलँडर 2, ऑडी क्यू 7 यासारख्या अनेक लक्झरी कार आहेत.

या कारचा व्हिडिओ बघून चाहते थक्क झाले असून, आपल्या लाडक्या क्रिकेटपटूचं हे कार्सचं वेड आणि त्याचा संग्रह बघून अनेकांनी त्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Cricket, MS Dhoni, Sakshi dhoni