नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध साकेत न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. जवळपास 50 फ्लॅटच्या खरेदीदारांनी हा आरोप केला आहे की, 2001 मध्ये फ्लॅट बुकींग केल्यानंतर अद्याप फ्लॅट मिळालेले नाहीत.
गाझियाबादमधील इंदिरापुरम इथल्या एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बूक करण्यात आले होते. मात्र, अद्याप फ्लॅट मिळाले नसल्याचा आरोप खरेदीदारांनी केला आहे. भाजप खासदार गौतम गंभीर रूद्र बिल्डवेल रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि एचआर इन्फ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या या प्रोजेक्टचा डायरेक्टर आणि ब्रँड अॅम्बॅसिडर होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध 2016 मध्ये हाउसिंग प्रोजेक्ट बुकिंग करण्याच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.
दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार, कंपनीने 6 जून 2013 रोजी फ्लॅट देण्याचा दावा केला होता. मात्र, 2014 पर्यंत फ्लॅट देण्यास टाळाटाळ केली. 15 एप्रिल 2015 मध्ये अधिकाऱ्यांनी काही त्रुटींमुळे प्रोजेक्टची मान्यता रद्द केली.
गंभीरशिवाय या प्रकरणात मुकेश खुराना, गौतम मेहरा आणि बबीता खुराना यांचीही नावे आहेत. खरेदीदारांचा आरोप आहे की, गंभीरने प्रोजेक्टमध्ये गुंतवणूकीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यात कंपनीला मदत केली होती. यांच्याविरुद्ध भादंवि कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेळता खेळता चिमुकला व्हॅनखाली चिरडला; अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gautam Gambhir