मुंबई, 7 मार्च : इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर भारताच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीग ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 21 सामने पारपडले असून यात विदेशी खेळाडूंचा देखील सहभाग आहे. परंतु या स्पर्धेतील क्रिकेट सामान्यांपेक्षा या स्पर्धेत घडणाऱ्या अजब आणि मनोरंजक घटनांमुळे ही स्पर्धा जास्त चर्चेत असते. पाकिस्तान सुपर लीगमध्ये कधी दोन संघातील खेळाडूंच्या आपापसातील संघर्षाचा व्हिडीओ समोर येत असतो तर कधी कॉमेंट्री करणाऱ्या महिलांसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर येत असते. अशातच आता भर मैदानावर एका कॉमेंट्रेटरने क्रिकेटरच्या पत्नीलाच कडेवर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलंड आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर डॅनी मॉरिसन आपली कॉमेंट्री करत लोकांचे मनोरंजन करत होते. यादरम्यान डॅनी मॉरिसन अचानकपणे एरिन हॉलंडच्या जवळ येतो आणि बोलता बोलता तिला अचानकपणे एखाद्या लहान मुलीप्रमाणे कडेवर उचलतो. एकवढेच करून तो थांबत नाही तर डॅनी तिला उचलून गरागरा फिरवतो. डॅनीच्या कृत्यामुळे अचानकपणे सर्वच थक्क होतात.
Love ya uncle @SteelyDan66 😂 @thePSLt20 pic.twitter.com/9reSq6ekdN
— Erin Holland (@erinvholland) March 5, 2023
कॉमेंट्रेटर एरिन हॉलंडने स्वतः हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत तिने मॉरिसनला थँक्यू अंकल म्हणत त्याला कोपरखळीही मारली आहे. यापूर्वी देखील न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर आणि कॉमेंट्रेटर डॅनी मॉरिसनने आयपीएलमध्ये देखील असेच कृत्य केले होते. त्याने आयपीएल सामन्यातील एका चिअर लीडर आपल्या मांडीवर उचलले होते यातून बराच वाद देखील निर्माण झाला होता.