जगातला महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo)फक्त फुटबॉलच नव्हे तर आपल्या गाड्यांच्या कलेक्शनसाठीही चर्चेत असतो. रोनाल्डोकडे सध्या जगातील टॉप गाड्यांचे कलेक्शन आहे.
आता रोनाल्डोच्या कलेक्शनमध्ये जगातली सर्वात महागडी कार सामिल झाली आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकतीच सर्वात महागडी अशी बुगाटी (Bugatti la voiture noire) खरेदी केली आहे. या गाडीची किंमत 75 कोटी आहे.
पोर्तुगालचा फुटबॉलपटू रोनाल्डोने रोनाल्डोने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या गाडीचा फोटो शेअर केला आहे.
रोनाल्डोनं या कारवर CR 7 असे लिहिलेले आहे. मुख्य म्हणजे रोनाल्डोला गाड्यांचे वेड आहे. सध्या त्याच्याकडे सुमारे 264 कोटींच्या कार आहेत.
रोनाल्डोने खरेदी केलेली Bugatti la voiture noire ही कार नसून एखाद्या वादळाप्रमाणे आहे. या कारचा टॉप स्पीड 380 किमी आहे. ताशी ही कार अवघ्या 2.4 सेकंदात 60 किमी पार करू शकते.
रोनाल्डोकडे याआधी बुगाटी वेरॉन ग्रँड स्पोर्ट, फेरारी 599 जीटीओ, लॅम्बोर्गिनी अॅव्हेंटोर, मॅक्लरेन एमपी4 12 सी अशा एकूण 264 कोटी किमतीच्या गाड्या आहेत.