मुंबई, 17 जुलै : कोरोनामुळे भारतात क्रिकेटचे सर्व सामने रद्द झाले आहेत. सध्या केवळ इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. मात्र असे असले तरी सोशल मीडियावर क्रिकेट विश्वातील मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Akash Chopra) एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये गोलंदाज अशी चेंडू टाकतो, की फलंदाजाला एक क्षण काही कळतच नाही. गोलंदाजानं टाकलेला चेंडू व्हाइड होता. त्यामुळं फलंदाजानं चेंडू सोडला मात्र स्टम्प जवळून अचानक चेंडू टर्न झाला आणि फलंदाज बोल्ड झाला. ही विकेट पाहून दोन क्षण फलंदाजालाही कळले नाही की नेमके काय झाले.
आकाश चोप्राने हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये चेंडू बाहेर जाताना दिसत आहे. मात्र अचानक चेंडू ज्याप्रकारे टर्न झाला, त्यावर कदाचित गोलंदाजालाही विश्वास बसला नसेल. फलंदाजीची विकेट गेल्याचे मैदानावर उपस्थित पंचांनाही कळले नाही. मात्र विकेट गेल्यानंतर फलंदाज शॉकमध्ये होता, तर इतर खेळाडू आनंद साजरा करत होते.
वाचा-शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जीचं झालं होतं शारीरिक शोषण; मुलाखतीत केला खुलासा
वाचा-फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला अन् झाला बोल्ड! असा VIDEO तुम्ही कधीच पाहिला नसेल
हा व्हिडीओ शेअर करताना आकाश चोप्रा यांनी कॅप्शनमध्ये, 'ही किती जबरदस्त डिलिव्हरी आहे', असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ एका लोकल टुर्नामेंटमधला असल्याचे म्हटले जात आहे. लॉकडाऊनच्या आधीचा हा व्हिडीओ असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाश चोप्रा कायमच मजेदार व्हिडीओ शेअर करत असतो.
वाचा-...आणि दिनेश कार्तिकनं लग्नाआधी पत्नीला रंगेहात पकडलं होतं