मुंबई, 27 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) शेवटच्या दिवसापर्यंत रंगली. न्यूझीलंडनं टीम इंडियाचा शेवटच्या दिवशी पराभव केला. भारतीय टीम पराभूत झाली असली तरी टीमच्या बॉलर्स आणि फिल्डर्सनी जोरदार संघर्ष केला. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने देखील फायनलमध्ये चांगली फिल्डिंग केली. या फायनलमध्ये विराट तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा करत असलेलं दृश्य व्हायरल (Viral) झाले होते. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर नील वॅग्नर (Neil Wagner) याने विराटच्या त्या कृतीचं कारण सांगितलं आहे. मैदानातील न्यूझीलंडचे समर्थक विराट कोहलीशी संबंधित गाणं गात होते. त्या गाण्यामुळे विराटची एकाग्रता भंग होत होती. त्यामुळे विराटने त्यांना शांत करण्यासाठी तोंडावर बोट ठेवण्याचा इशारा दिला होता, असे वॅग्नरने सांगितले. न्यूझीलंडचे समर्थक विराटचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याने संयमी पद्धतीनं स्वत:वर नियंत्रत ठेवत त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. हे प्रेक्षक न्यूझीलंडचा बॅट्समन डेवॉन कॉनवेसाठी गाणं गात होते, असं वॅग्नरनं म्हणाला. साऊथम्पटन टेस्टमध्ये विराट कोहलीला त्याच्या नेहमीच्या शैलीत जल्लोष करता आला नाही. असं असलं तरी त्याने मैदानावर भांगडा केला. साऊथम्पटनच्या मैदानावर 4 हजार प्रेक्षकांना सामना बघायला परवानगी होती, त्यामुळे भारतीय चाहते ढोल घेऊन मॅच बघण्यासाठी मैदानात आले होते. चाहते ढोल वाजवत असल्याचं पाहून विराटलाही आवरलं नाही आणि त्याने भांगडा केला.
🤣 😍 😀 🙄 🙃 😠
— ICC (@ICC) June 23, 2021
The many faces of Virat Kohli!
Which one will we have at the end of play today? 👀#WTC21 Final | #INDvNZ pic.twitter.com/Y0USGOFuhg
T20 वर्ल्ड कप भारताबाहेर होणार! BCCI सचिवांचं शिक्कामोर्तब विराटला फायनलमध्ये मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 44 तर दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 13 रन काढले. त्याला दोन्ही इनिंगमध्ये काईल जेमिसननं आऊट केलं. विराटचे अपयश हे देखील टीम इंडियाच्या पराभवाचे एक कारण ठरले.

)







