क्रिकेट: महिला संघाचा न्यूझीलंडमध्ये 24 वर्षानंतर डंका!

क्रिकेट: महिला संघाचा न्यूझीलंडमध्ये 24 वर्षानंतर डंका!

महिला संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

  • Share this:

माऊंट माँगानुए, 29 जानेवारी: भारताच्या पुरुष संघा बरोबरच महिलांचा संघ देखील सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. कालच विराट सेनेने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिका 3-0ने जिंकली. या यशाच्या पावलावर पाऊल ठेवत महिला संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

दुसऱ्या वनडेत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजी समोर न्यूझीलंडला केवळ 161 धावा करता आल्या. भारताकडून जलद गोलंदाज झूलन गोस्वामीने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर एकता बिष्ट, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शिखा पांडेने एक विकेट घेतली.

विजयाचे लक्ष्य भारतीय संघाने 35.2 षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक नाबाद 90 धावा केल्या तर तिला मिताली राजने नाबाद 62 धावांची सुरेख साथ दिली.

भारतीय महिला संघाने 24 वर्षानंतर मालिका जिंकली आहे. याआधी भारतीय संघाने 1995 न्यूझीलंडविरुद्ध मालिका 1-0ने जिंकली होती. 2006मध्ये पाच सामन्यांची मालिका भारताने 1-4ने हरली होती.


SPECIAL REPORT : तुमचे लहानगे मृत्युशी खेळत आहे का?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2019 01:26 PM IST

ताज्या बातम्या