इंग्लंडमध्ये जिवंत राहिलो नसतो, वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा!

इंग्लंडमध्ये (England) आपण वाढलो असतो तर जिवंत राहिलो नसतो, असा खळबळजनक दावा वेस्ट इंडिजच्या (West Indies) दिग्गज क्रिकेटपटूनं केला आहे.

इंग्लंडमध्ये (England) आपण वाढलो असतो तर जिवंत राहिलो नसतो, असा खळबळजनक दावा वेस्ट इंडिजच्या (West Indies) दिग्गज क्रिकेटपटूनं केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 23 जून: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) काही दिवसांपूर्वी वर्णद्वेषी ट्विट केल्याबद्दल ओली रॉबिन्सनला (Oly Robinson) निलंबित केले आहे. त्याचबरोबर खेळाडूंची याबबतची जुनी प्रकरणं तपासणार असल्याचंही क्रिकेट बोर्डानं जाहीर केलं आहे. या प्रकरणानंतर क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा वर्णद्वेषाच्या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडमध्ये आपण वाढलो असतो तर कदाचित जगलोच नसतो, असा खळबळजनक दावा वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूनं केला आहे. वेस्ट इंडिजचे माजी फास्ट बॉलर मायकल होल्डिंग (Michael Holding) यांनी इंग्लंडवर ही मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लायड यांच्या मृत्यूनंतर होल्डींग सातत्याने वर्णद्वेषाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. इंग्लंडमध्ये वर्णद्वेष रोखण्यासाठी जास्त प्रयत्न झाले नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे. ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे. या मुलाखतीमध्ये होल्डिंग यांनी सांगितले की, “मी तरुणपणामध्ये खूप रागीट होतो. 1980 साली न्यूझीलंडच्या दौऱ्यावर मी स्टंप मैदानाच्या बाहेर फेकून दिला होता. त्यामुळे माझ्याबद्दल काय घडले असते यातचा तुम्ही अंदाज लावू शकता. मी जिवंत वाचलो नसतो. मी जमेकामध्ये वाढलो. तिथे मला कधीही वर्णद्वेष सहन करावा लागला नाही. पण, जमेकाच्या बाहेर पडताच त्याचा सामना करावा लागला, असे होल्डिंग म्हणाले. संथ खेळणाऱ्या विल्यमसनला सेहवागनं केलं ट्रोल, शेअर केलं मजेदार Meme वर्णद्वेष कधीही संपणार नाही मायकल होल्डिंग यांनी यापूर्वी एका मुलाखतीमध्ये जगातून वर्णद्वेष कधीही पूर्णपणे संपणार नाही, असा दावा केला होता. होल्डिंग यांनी इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसेन आणि महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू इबोनी रेनफोर्ड ब्रॅट यांच्यासोबतच्या चर्चा सत्रामध्ये हा दावा केला होता. वर्णद्वेषी मंडळी जगात कायम असतील, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले होते.
    Published by:News18 Desk
    First published: