मैदानात नेहमीच शांत राहिलेल्या वसीम जाफरचा आता सोशल मीडियावर धुमाकूळ

भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) हा सध्या त्याच्या सोशल मीडियावरच्या मीम्समुळे चांगलाच चर्चेत असतो. यावेळी त्याने भारताचा दिग्गज स्पिनर आर. अश्विन (R.Ashwin) ला टॅग करत एक मीम शेयर केलं.

भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) हा सध्या त्याच्या सोशल मीडियावरच्या मीम्समुळे चांगलाच चर्चेत असतो. यावेळी त्याने भारताचा दिग्गज स्पिनर आर. अश्विन (R.Ashwin) ला टॅग करत एक मीम शेयर केलं.

  • Share this:
    मुंबई, 22 नोव्हेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) हा सध्या त्याच्या सोशल मीडियावरच्या मीम्समुळे चांगलाच चर्चेत असतो. यावेळी त्याने भारताचा दिग्गज स्पिनर आर. अश्विन (R.Ashwin) ला टॅग करत एक मीम शेयर केलं. हे मीम पाहून अश्विनलाही हसू आवरलं नाही. वसीम जाफरने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन आमीर खानचा चित्रपट लगानचा एक सीन शेयर केला आणि यात अश्विनला टॅग केलं. जाफरच्या या ट्विटवर अश्विननेही कमेंट केली. वसीम जाफरचं हे ट्विट अश्विन आणि मंकडिंगची जोडलं गेलं आहे. आयपीएलच्या 2019 सालच्या मोसमात अश्विनने बटलरला मंकडिंग करून आऊट केलं. या आयपीएलआधीही मंकडिंगचा मुद्दा गाजला होता. वसीम जाफरने लोकप्रिय चित्रपट लगानच्या सीनचा स्क्रीनशॉट शेयर केला. यामध्ये दिपूला मंकडिंग करून आऊट केलं जातं. ईएसपीएन क्रिकइन्फोने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक प्रश्न विचारला होता. कोणत्याही टीम किंवा खेळाडूचं नाव न घेता तुमच्या आवडत्या मॅचविषयी सांगा, असं ईएसपीएन क्रिकइन्फोने विचारलं होतं. याचं उत्तर देताना जाफरने लगानचा स्क्रीनशॉट शेयर केला होता. वसीम जाफरने हा स्क्रीनशॉट शेयर करताना अश्विनलाही टॅग केलं. जॉस बटलरला मंकडिंग केल्यानंतर क्रिकेट विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी अश्विनच्या या मंकडिंगचं समर्थन केलं होतं, तर काहींनी हे खेळ भावनेला धरून नसल्याचं सांगत विरोध केला होता. जाफरने शेयर केलेल्या या मीमवर अश्विनने इमोजीच्या मदतीने प्रतिक्रिया दिली. याआधी वसीम जाफरने आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल केल्यानंतर एक मीम शेयर केलं होतं. मागच्या काही दिवसांपासून वसीम जाफर त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मजेशीर मीम्स शेयर करत आहे. वसीम जाफर आयपीएल (IPL) मध्ये पंजाब (KXIP) च्या टीमचा प्रशिक्षक आहे. वसीम जाफरने भारताकडून खेळताना 31 मॅचमध्ये 1944 रन केले. जाफरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच शतकांचा समावेश आहे, यापैकी दोन द्विशतकंही आहेत. जाफरने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.
    Published by:Shreyas
    First published: