मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: प्रीती झिटांच्या टीमनं केलं दुर्लक्ष, 11 बॉलमध्ये 54 रन करत दिलं उत्तर

IPL 2022: प्रीती झिटांच्या टीमनं केलं दुर्लक्ष, 11 बॉलमध्ये 54 रन करत दिलं उत्तर

प्रीती झिंटाच्या (Preity Zinta) पंजाब किंग्जने (Punjab Kings) आश्चर्यकारक निर्णय घेत टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक बॅटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूला रिटेन न करण्याचा निर्णय घेतला होता.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 डिसेंबर : आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022) 8 टीमने त्यांच्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पंजाब किंग्जने (Punjab Kings) यावेळी आश्चर्यकारक निर्णय घेत टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक बॅटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूला रिटेन न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री प्रीती झिंटाच्या (Preity Zinta) टीमला या निर्णयाचा चांगलाच पश्चाताप होणार आहे.

विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare )  या बीसीसीआयच्या देशांतर्गत वन-डे मॅचच्या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तामिळनाडूचा आक्रमक बॅटर शाहरूख खान (Shahrukh Khan) याने मुंबई विरुद्ध फक्त 35 बॉलमध्ये 66 रनची खेळी केली आहे. शाहरुख आयपीएल 2021 मध्ये पंजाबच्या टीममध्ये होता. त्याने स्पर्धेत समाधानकारक कामगिरी केल्यानंतरही त्याला पंजाबने रिटेन केले नाही.

मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करताना तामिळनाडूची स्कोअर 38 ओव्हरनंतर 5 आऊट 179 झाला होता. त्यावेळी शाहरूख खान बॅटींगला आला. त्याने जे कौशिक सोबत सहाव्या विकेट्ससाठी 88 रनची भागिदारी केलीय यामध्ये 66 रन शाहरूखनेच काढले. त्याने 6 फोर आणि 5 सिक्ससह 188. 57 च्या स्ट्राईक रेटनं हे रन काढले. याचाच अर्थ त्याने फक्त 11 बॉलमध्ये 54 रन करत मुंबईच्या बॉलर्सची धुलाई केली. शाहरुखच्या या फटकेबाजीमुळे तामिळनाडूनं  निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 8 आऊट 290 पर्यंत मजल मारली.

मोठी बातमी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडिया संकटात, 4 प्रमुख खेळाडू Out!

फायनलमध्ये केली होती कमाल

 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy Final) तामिळनाडूने शाहरूखच्या खेळाच्या जोरावरच कर्नाटकचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. शेवटच्या बॉलला 5 रनची गरज असताना शाहरुख खानने (Shahrukh Khan) सिक्स मारत तामिळनाडूला लागोपाठ दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजेतेपद मिळवून दिले. शाहरुखने हा फॉर्म विजय हजारे स्पर्धेतही कायम ठेवत बलाढ्य मुंबईच्या बॉलर्स विरूद्ध आक्रमक अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे आगामी आयपीएल  लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागणार हे निश्चित आहे.

First published:

Tags: Cricket news, Preity zinta, Punjab kings, Shahrukh khan