जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / इंग्लंड क्रिकेटमध्येही सापडला Tim Paine! अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप

इंग्लंड क्रिकेटमध्येही सापडला Tim Paine! अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप

इंग्लंड क्रिकेटमध्येही सापडला Tim Paine! अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टीम पेनला (Tim Paine) महिला सहकाऱ्याा अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याचं प्रकरण उघड झाल्यानं राजीनामा द्यावा लागला आहे. हे प्रकरण सध्या गाजत असतानाच इंग्लंड क्रिकेटमध्येही असाच एक प्रकार घडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टीम पेनला (Tim Paine) महिला सहकाऱ्याा अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याचं प्रकरण उघड झाल्यानं राजीनामा द्यावा लागला आहे. हे प्रकरण सध्या गाजत असतानाच इंग्लंड क्रिकेटमध्येही असाच एक प्रकार घडला आहे. यॉर्कशरचा क्रिकेटपटू अझीम रफीकवर (Azeem Rafiq) 6 वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. रफीक गेल्या काही काळापासून वर्णद्वेषावरील (racism) आरोपांबाबत चर्चेत आहे. त्यानं डिजिटल, कल्चर, मीडिया आणि ब्रिटीश खासदारांच्या स्पोर्ट्स कमिटीसमोर (DCMS) झालेल्या सुनावणीत यॉर्कशर टीममध्ये त्याला मिळालेल्या वर्णद्वेषी आणि पक्षपाती अनुभवाचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर रफीकवर हा गंभीर आरोप झाला आहे. काय आहे प्रकरण? ‘यॉर्कशर पोस्ट’च्या रिपोर्टनुसार 16 वर्षांची यॉर्कशरमध्ये राहणारी आशियाई वंशाची मुलगी रफीकला भेटली होती. तिनं तिचं वय 17 असल्याचं सांगितलं होतं. मँचेस्टर ते दुबई या विमानात त्यांची भेट झाली. या भेटीनंतर 3 महिन्यांनी रफिकनं तिला अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2015 मध्ये रफीकनं हे मेसेज पाठवले होते. या मेसेजचे स्क्रीन शॉट्स या मुलीनं वृत्तपत्रांनी दिले आहेत. या मेसेजमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती, तसंच ते अश्लील होते, असा दावा या मुलीनं केला आहे. IPL 2022 खेळणार की नाही? महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं Update, पाहा VIDEO रफीकच्या प्रवक्त्यानं या विषयावर लगेच कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. रफिकनं यापूर्वी आशियाई वंशाच्या खेळाडूंना मिळत असलेल्या खराब वागणुकीच्या विरुद्ध आवाज उठवला होता. आशियाई खेळाडूंना ‘केव्हिन’ या नावाने बोलवले जाते. यॉर्कशरकडून खेळताना त्याला अनेकदा पाकी या नावानं हाक मारण्यात येत असे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही. इतकंच नाही तर वयाच्या 15 व्या वर्षी त्याला जबरदस्तीनं दारू पाजण्यात आली होती,’ असा गौप्यस्फोट रफीकनं केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात