मुंबई, 12 जून : भारतीयच नाही तर जागतिक क्रिकेटमधील एक प्रमुख क्रिकेटपटू म्हणून स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ओळखली जाते. स्मृतीच्या सातत्यपूर्ण खेळाची दखल आयसीसीनं देखील घेतली आहे. आयसीसीनं ‘वूमन क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन तिचा गौरव केला आहे. स्मृतीनं ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये तिच्या खेळाबद्दल मत व्यक्त केले असून तिची मॅचपूर्वीचं एक खास रहस्य देखील सांगितलं आहे. स्मृतीनं या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘मॅचसाठी तयार होण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. मी क्रिकेट खेळणं का सुरू केलं हे आठवते. बॅटींग केल्यानं मला आनंद मिळतो. त्याचा विचार केल्यानंतर माझा मुड फ्रेश होतो. मी बेसिक्सवर काम करते. मॅचनंतर 15 मिनिटनं माझ्या खेळावर विचार करते. मी काय बरोबर केलं? माझं काय चुकलं? याचा विचार करते. त्यानंतर स्वत:ला रिसेट करते आणि स्वत:ला थोडावेळ क्रिकेटपासून दूर ठेवते.’ असं स्मृतीनं सांगितलं. स्मृतीनं यावेळी तिची मॅचपूर्वीची खास सवय देखील सांगितली. ‘मला काही वर्षांपूर्वी मॅचच्या आधी गाणी ऐकायला आवडत असे. एखादं गाणं ऐकल्यानंतर मी शतक झळकावलं तर पुन्हा तेच गाणं ऐकत असे. सुरूवातीला माझ्या क्रिकेटच्या साहित्याबाबतही माझा हाच समज होता, पण मी आता हे काही करत नाही. आता फक्त मी खेळावर फोकस करते,’ असं स्मृतीनं स्पष्ट केलं. IND vs SA : ‘डेव्हिड मिलरला टीममधून वगळा’, टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूची मागणी आगामी कॅलेंडर वर्ष अतिशय व्यस्त असेल. हे संपूर्ण वर्ष महत्त्वाचे आहे. माझा टीमसाठी जास्तीत जास्त चांगलं खेळण्याचा प्रयत्न असेल. माझ्या टीमनं जास्तीत जास्त मॅच जिंकाव्या अशी माझी इच्छा आहे. गेल्या 5-6 वर्षांमध्ये महिला क्रिकेटला मोठी चालना मिळाली आहे. आता या महिला क्रिकेटच्या प्रेक्षकांमध्येही वाढ झाली आहे. हा बदल आवश्यक आहे. अधिक चालना मिळाल्यानंतरच खेळाचा विकास होईल,’ असे तिने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







