• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T20 World Cup: अश्विनच्या निवडीसाठी होता रोहितचा आग्रह, विराटनं ठेवली होती 'ही' अट

T20 World Cup: अश्विनच्या निवडीसाठी होता रोहितचा आग्रह, विराटनं ठेवली होती 'ही' अट

T20 वर्ल्ड कपसाठी अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनची (R. Ashwin) टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. अश्विनची ही निवड सर्वांसाठीच आश्चर्यकारक होती.

  • Share this:
    मुंबई, 11 सप्टेंबर : T20 वर्ल्ड कपसाठी अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनची (R. Ashwin) टीम इंडियामध्ये निवड झाली  आहे. अश्विनची ही निवड सर्वांसाठीच आश्चर्यकारक होती. 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर 4 वर्षांनी अश्विनचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. या दरम्यानच्या काळात अश्विननं टेस्ट क्रिकेट तसंच आयपीएल स्पर्धेत सातत्यानं चांगली कामगिरी केली होती. पण, निवड समितीनं लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटसाठी त्याचा विचार केला नव्हता. अश्विनच्या निवडीसाठी टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आग्रही होता. 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार रोहितनं अश्विनच्या पुनरागमनात महत्त्वाची भूमिका बजावली. याबबत कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याला विचारण्याक आलं, त्यावेळी त्यानंही अश्विनच्या नावावर सहमती दाखवली. पण, त्यानं सुरुवातीला यासाठी एक अट ठेवली  होती. टीम इंडियाचा ऑफ स्पिनर  वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar) कामगिरी खराब झाली किंवा तो फिट झाला नाही, तर अश्विनला टीममध्ये स्थान देण्यात यावं, असं विराट म्हणाला. अंगठ्याच्या दुखापतीमुळे सुंदर बाहेर झाल्यामुळे अश्विनची निवड निश्चित झाली. निवड समितीच्या बैठकीत विराट आणि रोहित यांनी अश्विनचं कौतुक केलं, तसंच आयपीएलदरम्यान युएईमध्ये अश्विनला खेळणं कठीण गेल्याचंही दोघांनी सांगितलं. वर्ल्ड कपही युएईमध्ये होणार आहे, तिथल्या संथ खेळपट्ट्यांवर अश्विन आणखी घातक होईल, असं दोघांचं म्हणणं होतं. आयपीएल 2020 नंतर अश्विनने पॉवरप्लेमध्ये डावखुऱ्या बॅट्समनना 70 बॉल टाकले, यात त्याने फक्त 6.77 च्या इकोनॉमी रेटने रन दिल्या, तसंच त्याची बॉलिंग सरासरीही 26.33 ची राहिली. यादरम्यान त्याने 7 विकेट घेतल्या. पॉवरप्लेमध्ये अश्विनपेक्षा जास्त विकेट दुसऱ्या कोणत्याही स्पिनरला मिळाल्या नाहीत. वर्ल्ड कपसाठी टीम  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, राहुल चहर, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, वरुण चक्रवर्ती राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर
    Published by:News18 Desk
    First published: