मुंबई, 17 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपला आजपासून (17 ऑक्टोबर) सुरुवात होत असली तरी सर्वांना 24 ऑक्टोबरचे वेध लागले आहेत. या दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे. दोन्ही टीम या मॅचनं वर्ल्ड कप अभियानाला सुरूवात करतील. या महामुकाबल्याच्या निमित्तानं दोन्ही देशांच्या फॅन्समध्ये सोशल मीडियावर वॉर सुरू झालं आहे. आगामी काळात हे वॉर आणखी तीव्र होईल. भारताची टेनिसपटू आणि पाकिस्तान क्रिकेट टीमचा सदस्य शोएब मलिक (Shoaib Mailk) याची पत्नी सानिया मिर्झानं (Sania Mirza) त्यादिवशीचा प्लॅन सांगितला आहे. सानियानं भारत-पाकिस्तान मॅचच्या दिवशी सोशल मीडियापासून दूर राहण्याचं ठरवलं आहे. दोन्ही देशांतील फॅन्समध्ये असलेलं टोकाचं वैर लक्षात घेऊन सानियानं हा निर्णय घेतला आहे. सानियानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘मी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मॅचच्या दरम्यानचं कलुषित वातावरण टाळण्यासाठी सोशल माीडियावरुन गायब होणार आहे.‘असं सानियानं जाहीर केलं आहे.
सानियाचा नवरा शोएब मलिकचा पाकिस्तान टीममध्ये सुरुवातीला समावेश करण्यात आला नव्हता. मात्र शोएब मकसूद जखमी झाल्यानं त्याला टीममध्ये जागा देण्यात आली. शोएब टी20 क्रिकेटमधील पाकिस्तानचा सर्वात यशस्वी बॅटर आहे. त्यानं 443 मॅचमध्ये 11033 रन केले आहेत. शोएब 2007 साली झालेल्या पहिल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान टीमचा कॅप्टन होता. या टीमचा फायनलमध्ये टीम इंडियानं पराभव केला होता. वेस्ट इंडिजमध्ये 2010 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपचा अपवाद वगळता शोएब आजवरचे सर्व टी20 वर्ल्ड कप खेळला आहे. विराट कोहलीला त्याच्या मित्रांनी मागितली भारत-पाकिस्तान मॅचचं तिकीटं, वाचा काय दिलं कॅप्टननं उत्तर टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व 5 मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. 2007 साली ग्रुप स्टेज आणि फायनलमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा पराभव केला होता. त्याचबरोबर 2012, 2014 आणि 2016 मध्येही टीम इंडियामं विजय मिळवला आहे. दोन्ही देशांच्या टीम 2 वर्षांनी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यापूर्वी 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांची लढत झाली होती. त्यावेळी टीम इंडियानं पाकिस्तानवर 89 रननं दणदणीत विजय मिळवला होता.

)







