मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: डेव्हिड वॉर्नरनं केली रोनाल्डोची नक्कल, Coco Cola च्या बॉटलवरून ड्रामा; VIDEO

T20 World Cup: डेव्हिड वॉर्नरनं केली रोनाल्डोची नक्कल, Coco Cola च्या बॉटलवरून ड्रामा; VIDEO

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) डेव्हिड वॉर्नरनं पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखं (Cristiano Ronaldo) करण्याचा प्रयत्न केला. वॉर्नरनं टेबलवर ठेवलेली Coca Cola या कंपनीच्या बॉटल काढल्या.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 29 ऑक्टोबर: डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) आक्रमक बॅटींगच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) श्रीलंकेचा 7 विकेट्सनं पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन एरोन फिंचनं (Aaron Finch) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं निर्धारित ओव्हर्समध्ये 6 आऊट 154 रन केले. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियानं 17 व्या ओव्हर्समध्येच 3 विकेटच्या मोबदल्यात हे लक्ष्य साध्य केलं.

गेल्या काही दिवसांपसून खराब फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरनं 42 बॉलमध्ये 65 रनची खेळी केली. फिंचनं 37 आणि स्टीव्ह स्मिथनं 28 रन काढले. ऑस्ट्रेलियन स्पिनर अ‍ॅडम झम्पाला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या मॅचनंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वॉर्नर सहभागी झाला होता.

रोनाल्डोच्या पावलावर पाऊल

प्रेस कॉन्सफरन्स सुरू होताच वॉर्नरनं पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखं (Cristiano Ronaldo) करण्याचा प्रयत्न केला. वॉर्नरनं टेबलवर ठेवलेली Coca Cola या कंपनीच्या बॉटल काढल्या. रोनाल्डोनंही  काही महिन्यांपूर्वी युरो कप स्पर्धेतील पत्रकार परिषदेत याच कंपनीच्या बॉटल काढल्या होत्या आणि पाण्याची बॉटल हातामध्ये घेऊन लोकांना पाणी पिण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे या सॉफ्ट ड्रिंक कंपनीचं मोठं नुकसान झालं होतं.

वॉर्नरनंही रोनाल्डो सारखं करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं बॉटल हटवताच एका अधिकाऱ्यानं तातडीनं हस्तक्षेप करत त्याला स्पॉनरशिपमुळे त्या बॉटल तिथं पुन्हा ठेवण्यासाठी सांगितले.

वॉर्नरनं त्या अधिकाऱ्याच्या सूचनेची अंंलबजवणी करत बॉटल्स पुन्हा टेबलावर ठेवल्या. पण रोनाल्डोसाठी हे चांगलं असेल तर माझ्यासाठीही चांगलं आहे, असंही यावेळी सांगितलं.

T20 World Cup: पाकिस्‍तानी क्रिकेटर मोहम्‍मद हफीजला सानिया मिर्झानं कसं वाचवलं? Photos

डेव्हिड वॉर्नरसाठी गेले काही दिवस त्रासदायक ठरले होते. आयपीएल 2021 च्या दरम्यान त्याला सनरायझर्स हैदाराबादची कॅप्टनसी गमवावी लागली. त्यानंतर त्याला टीममधूनही वगळण्यात आले. आता टी20 वर्ल्ड कपच्या निर्णायक टप्प्यात श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानं त्याचा आत्मविश्वास वाढला असेल.

First published:

Tags: David warner, T20 world cup, Video viral