Home /News /sport /

Shane Warne: ज्या ठिकाणाहून शेअर केली अखेरची Insta story त्याच ठिकाणी कोसळला वॉर्न

Shane Warne: ज्या ठिकाणाहून शेअर केली अखेरची Insta story त्याच ठिकाणी कोसळला वॉर्न

शेन वॉर्नचे थायलंडमधील कोह सामुई इथल्या व्हिलामध्ये होता. त्याचा फोटोही त्यानं शेअर केला होता. त्याच व्हिलामध्ये तो बेशुद्धावस्थेत सापडला होता.

    दिल्ली, 4 मार्च: क्रिकेटविश्वाला हादरवून टाकणारी घटना 4 मार्चला घडली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज फिरकीपट्टू शेन वॉर्नचं (Australia cricket Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं. ऑस्ट्रेलियाला एकाच दिवसात बसलेला हा दुसरा धक्का होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांचं निधन झाल्याचं वृत्त सकाळीच आलं होतं. त्यावर शेन वॉर्नने सकाळी साडेसातच्या सुमारास ट्वीटही केलं होतं. तेच त्याचं अखेरचं ट्वीट ठरलं. शेन वॉर्न थायलंडला एका व्हिलामध्ये होता. त्याचा फोटोही त्यानं शेअर केला होता आणि रॉड मार्श यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. त्याच व्हिलामध्ये तो बेशुद्धावस्थेत सापडला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 52 व्या वर्षी शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र इतका फीट असतानाही त्याला इतक्या कमी वयात हृदयविकाराचा (Australia cricket Shane Warne ्dies due to heart attack) झटका आला, याचं गूढ अद्याप चाहत्यांच्या मनात आहे. शेन वॉर्नचे थायलंडमधील कोह सामुई इथल्या व्हिलामध्ये होता. त्याचा फोटोही त्यानं शेअर केला होता. त्याच व्हिलामध्ये तो बेशुद्धावस्थेत सापडला होता. वैद्यकीय स्टाफने वॉर्नला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याला वाचवता आले नाही, अशी माहिती सांगण्यात येत आहे. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारं ट्विट केलं होतं. त्यांनी लिहलंय की, रॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं. तो क्रिकेटमधील महान खेळाडू होता आणि अनेक तरुण मुला-मुलींसाठी एक प्रेरणा होता. रॉडला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्यांनी क्रिकेटला खूप काही दिलं. विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांनी खूप काही दिलं. या बिकट काळात मी Ros आणि त्यांच्या कुटुंबाच्या भावनांसोबत आहे. RIP हे ट्वीट आणि कोह सामुईमधून शेअर केलेली Insta Story अखेरची ठरली. ऑस्ट्रेलियन महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या (Australia cricket Shane Warne) निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. वयाच्या 52 व्या वर्षी शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र इतका फिट असतानाही त्याला इतक्या कमी वयात हृदयविकाराचा (Australia cricket Shane Warne ्dies due to heart attack) झटका आला, याचं गूढ अद्याप चाहत्यांच्या मनात आहे.
    First published:

    Tags: Shane Warne, Thailand

    पुढील बातम्या