जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ranji Trophy : 10 कोटींच्या बॉलरची कमाल, 28 बॉलमध्ये घेतल्या 6 विकेट्स! VIDEO

Ranji Trophy : 10 कोटींच्या बॉलरची कमाल, 28 बॉलमध्ये घेतल्या 6 विकेट्स! VIDEO

Ranji Trophy : 10 कोटींच्या बॉलरची कमाल, 28 बॉलमध्ये घेतल्या 6 विकेट्स! VIDEO

आयपीएल स्पर्धेपूर्वी (IPL 2022) राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) चांगली बातमी आहे. त्यांनी 10 कोटींना खरेदी केलेल्या बॉलरनं रणजी क्रिकेट स्पर्धेत फक्त 28 बॉलमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

crमुंबई, 26 फेब्रुवारी : टीम इंडियाचा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णानं (Prasidh Krishna) रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरविरूद्ध दमदार कामगिरी केली आहे. त्याने कर्नाटककडून खेळताना (Karnataka vs Jammu and Kashmir) 35 रन देत 6 विकेट्स घेतल्या. त्याने यावेळी फक्त 28 बॉलमध्ये काश्मीरच्या 6 खेळाडूंना आऊट केले. त्याच्या या स्पेलमुळे जम्मू काश्मीरची पहिली इनिंग फक्त 93 रनवर संपुष्टात आली. त्यानंतर कर्नाटकनं त्यांची आघाडी 337 रनपर्यंत पोहचवली आहे. टीम इंडियाकडून गेल्या वर्षी वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कृष्णानं काश्मीरच्या इनिंगला सुरूंग लावला. त्यांची टीम फक्त 29.5 ओव्हर्समध्ये आटोपली. कृष्णाला आगामी आयपीएल सिझनसाठी राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 10 कोटींमध्ये खरेदी केले आहे.  यापूर्वी कर्नाटकनं शुक्रवारी सकाळी 8 आऊट 268 पासून पुढे खेळण्यास सुरूवात केली होती. कर्नाटककडून करूण नायरनं 175 रन केले. त्याच्या खेळीच्या जोरावर त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 302 रन केले.

जाहिरात

जम्मू काश्मीरकडून कामरान इक्बाल (35) आणि जतीन वाधवान (25) यांनी चांगली सुरूवात केली. पण, कृष्णाच्या स्पेलनं मॅचचं चित्र बदललं. त्याने काश्मीरच्या पहिल्या सातपैकी सहा विकेट्स घेतल्या. कर्नाटकची दुसऱ्या इनिंगमध्येही सुरूवात चांगली झाली. आर. समर्थ (62) आणि देवदत्त पडिक्कल (49) यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. IND vs SL : ऋतुराज गायकवाड T20 सीरिजमधून आऊट! ‘या’ खेळाडूला मिळाली संधी देवदत्त पडिक्कल आणि आर. समर्थ हे दोघंही दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी आऊट झाले. दिवसाच्या अखेरिस कर्नाटकनं 2 आऊट 128 रन केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात