मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'त्या' मॅचवर मुंबई इंडियन्सनं ट्रोल केल्यानंतर राजस्थान रॉयल्सची मजेशीर प्रतिक्रिया

'त्या' मॅचवर मुंबई इंडियन्सनं ट्रोल केल्यानंतर राजस्थान रॉयल्सची मजेशीर प्रतिक्रिया

मुंबईनं (MI) ती मॅच जिंकून 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश केला होता. त्या मॅचच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुंबई इंडियन्सनं  त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने (RR) मजेशीर उत्तर दिले आहे.

मुंबई, 26 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात सात वर्षांपूर्वी आयपीएल स्पर्धेत (IPL 2014) जबरदस्त लढत झाली होती. मुंबईनं ती मॅच जिंकून 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश केला होता. त्या मॅचच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुंबई इंडियन्सनं  त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने मजेशीर उत्तर दिले आहे.

मुंबईने त्या मॅचमध्ये 14.4 ओव्हर्समध्ये 195 रन करत 'प्ले ऑफ' प्रवेश केला. या मॅचमध्ये मुंबईच्या आदित्य तरेची (Aditya Tare)  निर्णायक भूमिका होती. त्याने राजस्थानचा बॉलर जेम्स फॉकनरनच्या बॉलवर सिक्स मारत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

आदित्य तरेनं सिक्स मारल्यानंतर शर्ट वर करत मैदानातून धाव घेतली होती. मुंबई इंडियन्सनं त्यावर एक पोस्ट शेअर केली आहे."कधीही हार मानता कामा नये. 7 वर्षांपूर्वी एक बॉल बाऊंड्री लाईननच्या पार गेला. तरे नॉर्थ स्टँडच्या दिशेनं पळाला आणि संपूर्ण वानखेडे स्टेडियम सेलिब्रेशन करत होते.'' असे ट्विट मुंबई इंडियन्सने पोस्ट केले आहे.

मुंबईच्या या पोस्टवर राजस्थान रॉयल्सने मजेशीर मीम शेअर केले आहे. यामध्ये काही जण रडताना दिसत आहे. 'होय भावा सर्व माहिती आहे.' असं कॅप्शन राजस्थानने दिले आहे.

व्यंकटेश प्रसादशी 1996 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या वादावर सोहेलचं स्पष्टीकरण, म्हणाला...

मुंबई इंडियन्सला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी चांगल्या रनरेटसह राजस्थान रॉयल्सचा पराभव करणे आवश्यक होते. मुंबईला त्यासाठी 14.3 ओव्हरमध्ये 190 रनचे आव्हान होते. मुंबईने 14.3 ओव्हरमध्ये 189 रन करत बरोबरी साधली. त्यानंतर प्ले ऑफ गाठण्यासाठी मुंबईला 1 बॉलमध्ये 4 रन हवे होते. त्यावेळी तरेने सिक्स लगावत मुंबईला थरारक विजय मिळवून दिला.

First published:

Tags: Cricket, Ipl, Mumbai Indians, Rajasthan Royals