जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / फाफ ड्यू प्लेसिसनं दिलं दुखापतीचं अपडेट, PSL 2021 मध्ये खेळण्याबाबत म्हणाला...

फाफ ड्यू प्लेसिसनं दिलं दुखापतीचं अपडेट, PSL 2021 मध्ये खेळण्याबाबत म्हणाला...

फाफ ड्यू प्लेसिसनं दिलं दुखापतीचं अपडेट, PSL 2021 मध्ये खेळण्याबाबत म्हणाला...

पाकिस्तान सुपर लीग (PSL 2021) मध्ये खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन फाफ ड्यू प्लेसिस (Faf Du Plessis) याने त्याच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 14 जून: पाकिस्तान सुपर लीग (PSL 2021) मध्ये खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन फाफ ड्यू प्लेसिस (Faf Du Plessis) याने त्याच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे. ड्यू प्लेसिस पीएसएलमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या टीमकडून खेळत आहे. शनिवारी त्यांची मॅच पेशावर विरुद्ध होती. पेशावरच्या बॅटींगच्या दरम्यान सातव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर तो फिल्डिंग करताना जखमी झाला होता. डेव्हिड मिलरने लाँग ऑनला मारलेला बॉल पकडण्यासाठी फाफाने डाईव्ह मारली. त्यावेळी तो बॉल पकडण्यासाठी आलेल्या हसनैनचा पाय त्याच्या डोक्याला लागला. त्यानंतर काही वेळ फाफ मैदानावरच पडून होता. त्यानंतर त्याला बाहेर नेण्यात आले.

जाहिरात

ड्यू प्लेसिसने ट्विट करत त्याच्या तब्येतीचं अपडेट दिलं आहे. त्याने सर्व प्रथम सर्वांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत. आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून टीमच्या हॉटेलमध्ये परतल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे. दुखापत झाल्यामुळे काही काळ ‘मेमरी लॉस’ झाला होता. आता आपण पूर्ण ठीक असून पीएसएलमधील उर्वरित मॅचमध्ये खेळणार असल्याचं त्याने स्पष्ट केले.

धोनीचं टेन्शन दूर फाफ ड्यू प्लेसिसच्या या ट्विटमुळे महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) टेन्शन दूर झालं आहे. ड्यू प्लेसिस धोनी कॅप्टन असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या आयपीएल टीमचा सदस्य आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी ड्यू प्लेसिसनं चेन्नईकडून सर्वात जास्त रन काढले होते. आता आयपीएल स्पर्धेचा उत्तरार्ध सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात