मुंबई, 2 फेब्रुवारी: क्रिकेटमध्ये कोणत्या वेळी, कोणत्या बॉलवर मॅचचं चित्र बदलेल हे सांगता येत नाही. अनेकदा पराभूत होत असलेली टीम मॅच जिंकते. तर विजय नक्की झाल्यानंतरही एखाद्या टीमचा पराभव होतो. क्रिकेटमधील या अनिश्चिततेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. या मॅचमध्ये शेवटच्या बॉलवर जिंकायला 5 रन हवे होते. त्यावेळी बॉलरनं नो बॉल टाकला नाही तसंच त्यावर सिक्स आणि फोर देखील गेला नाही तरीही बॅटींग करणारी टीम विजयी झाली. कुणाचाही पटकन विश्वास बसणार नाही, अशी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. पाकिस्तानमधील कराची शहरातल्या मॅचमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे.कराचीमधील अल-वकील क्रिकेट लीगमधील ओटोमॉल आणि ऑडियानिक टीममधील मॅचच्या दरम्यान हा प्रकार घडला. या मॅचमध्ये दोन्ही टीममध्ये जोरदार लढत झाली. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅचचा निकाल अनिश्चित होता. शेवटच्या बॉलवर हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार घडला. ऑटोमल टीमला 20 ओव्हर्समध्ये मॅच जिंकण्यासाठी 155 रनचे लक्ष्य होते. त्यांना शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी 5 रन हवे होते. त्यावेळी फोर किंवा सिक्स शिवाय विजय मिळणार नाही, असंच सर्वांना वाटत होते. पण प्रत्यक्षात वेगळेच घडले.
How to score 5 runs off the last ball to win without hitting a boundary… @ThatsSoVillage pic.twitter.com/0nIyl5xbxi
— The ACC (@TheACCnz) February 1, 2022
या मॅचच्या व्हायरल व्हिडीमध्ये नेमकं काय झालं याचा उलगडा झाला आहे. शेवटच्या बॉलवर बॅटरनं मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा तो प्रयत्न पूर्ण झाला नाही. तो बॉल सरळ लाँग ऑनला उभ्या असलेल्या फिल्डरच्या हातामध्ये जातो त्यावेळी तो फिल्डर बॉल थ्रो करण्याच्या ऐवजी बॉल स्वत: घेऊन पळत येतो. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी लढत, वाचा कुठे पाहाणार Live Streaming? त्यानं नॉन स्ट्रायकर एंडला स्टंप उडवेपर्यंत 3 रन पूर्ण झाले होते. त्यानंतर तो फिल्डर दुसऱ्या बाजूला धावू लागतो. तो यावेळी रन-आऊटसाठी बॉल थ्रो करतो पण बॉल स्टंपला न जाता थर्डमॅनला जाते आणि त्या दरम्यान दोन्ही बॅटर उर्वरित 2 रन पळून पूर्ण करतात. या पद्धतीनं शेवटच्या बॉलवर नो बॉल, सिक्स किंवा फोर यापैकी काहीही न घडता 5 रन करत विजय मिळवण्याचा दुर्मिळ रेकॉर्ड ऑटोमल टीमच्या नावावर झाला आहे.