मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: आयपीएल फायनलपूर्वी Dream11 ला मोठा धक्का, 'या' राज्यातील कारभार झाला बंद

IPL 2021: आयपीएल फायनलपूर्वी Dream11 ला मोठा धक्का, 'या' राज्यातील कारभार झाला बंद

आयपीएल फायनलला (IPL 2021 Final) काही दिवस बाकी असतानाच ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप Dream 11 ला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएल फायनलला (IPL 2021 Final) काही दिवस बाकी असतानाच ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप Dream 11 ला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएल फायनलला (IPL 2021 Final) काही दिवस बाकी असतानाच ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप Dream 11 ला मोठा धक्का बसला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 ऑक्टोबर:  आयपीएल स्पर्धेचा (IPL 2021) थरार शेवटच्या टप्प्यात आला आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या काळात Dream 11 या स्पोर्ट्स गेमिंग अ‍ॅपच्या जाहिरातींचा भडिमार टीव्हीवर असतो. क्रिकेट फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात हे अ‍ॅप लोकप्रिय आहे. आता आयपीएल स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आल्यानं या अ‍ॅपच्या आयोजकांना मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र आयपीएल फायनलला (IPL 2021 Final) काही दिवस बाकी असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीनं कर्नाटकमधील कारभार स्थगित केला आहे.

काय आहे प्रकरण?

कर्नाटक सरकारनं काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन गेमिंगवर बंदी घातली आहे. याबाबतच्या कायद्यामध्येही  (Karnataka gambling law) सरकारनं सुधारणा केली आहे, त्यानंतर मंजूनाथ या 42 वर्षांच्या कॅब ड्रायव्हरनं Dream 11 हे अ‍ॅप बंदीनंतरही सुरू असल्याची तक्रार बेंगळुरुतील अन्नपूर्णेश्वरी नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

कंपनीचे संस्थापक संचालक हर्ष जैन आणि भावित सेठ यांच्याविरोधात ही FIR दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना समन्स पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर कंपनीनं कर्नाटकातील कारभार बंद करत असल्याची घोषणा केली.

कंपनीनं सोशल मीडियावर रविवारी याबाबतची घोषणा केली. 'नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मीडिया कव्हरेजनंतर कर्नाटकातील युझर्सनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. ग्राहकांच्या या काळजीची दखल घेत आम्ही कर्नाटकमधील सेवा बंद कण्याचा निर्णय घेतला आहे.' असं कंपनीनं जाहीर केलं आहे.

आम्ही एक जबाबदार कंपनी असून कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर आम्ही सध्या कायदेशीर सल्ला घेत आहोत, असंही कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले आहे.

First published:

Tags: IPL 2021, Karnataka