मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

8 वर्षांपूर्वी टीम इंडियाने रचला होता इतिहास, विराटला पुन्हा आहे 'ती' संधी

8 वर्षांपूर्वी टीम इंडियाने रचला होता इतिहास, विराटला पुन्हा आहे 'ती' संधी

विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला फायनलमध्ये (WTC Final) शेवटच्या दिवशी खेळताना आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका इतिहासाची प्रेरणा मिळणार आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला फायनलमध्ये (WTC Final) शेवटच्या दिवशी खेळताना आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका इतिहासाची प्रेरणा मिळणार आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला फायनलमध्ये (WTC Final) शेवटच्या दिवशी खेळताना आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका इतिहासाची प्रेरणा मिळणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 जून : पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final 2021) फायनलचा शेवटचा दिवस खेळण्यासाठी टीम इंडिया बुधवारी मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला शेवटच्या दिवशी खेळताना आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका इतिहासाची प्रेरणा मिळणार आहे.

टीम इंडियानं आजच्या दिवशी आठ वर्षांपूर्वी (23 जून 2013 ) फायनल मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champions Trophy) विजेतेपद पटकावले होते. विशेष म्हणजे ती फायनल देखील इंग्लंडमध्येच झाली होती तसेच त्यामध्येही पावसाचा अडथळा आला होता.

20 ओव्हर्सची झाली होती मॅच

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पावसाचा अडथळा आला. त्यामुळे 50 ओव्हर्सची फायनल 20-20 ओव्हर्सची खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. इंग्लंडचा कॅप्टन एलिस्टर कूकने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटींगचे निमंत्रण दिले. रोहित शर्मा (Rohit Sharma) 9 रन काढून आऊट झाला. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट कोहली (Virat Kohli) जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 31 रनचा पार्टरनशिप केली. धवन 31 रनवर आऊट झाला. दिनेश कार्तिक, सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी हे मिडल ऑर्डरचे बॅट्समन झटपट परतले. त्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाने इंग्लंड समोर 130 रनचे टार्गेट ठेवले. भारताकडून जडेजाने 33 तर विराट कोहलीने सर्वाधिक 43 रन केले.

इशांत शर्माच्या ओव्हरने फिरली मॅच

इंग्लंडसमोर 20 ओव्हरमध्ये 130 रनचं सोपं टार्गेट होतं. त्यांची सुरुवात खराब झाली. 9 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडची अवस्था 4 आऊट 46 होती. त्यानंतर इऑन मॉर्गन (Eoin Morgan) आणि रवी बोपारा (Ravi Bopara) जोडीनं 64 रनची पार्टरनरशिप करत इंग्लंडला विजयाच्या जवळ नेले होते.

त्यावेळी इशांत शर्मााला (Ishant Sharma) ओव्हर देण्याची कॅप्टन धोनीची चाल यशस्वी ठरली. इशांतनं एकाच ओव्हरमध्ये मॉर्गन आणि बोपाराला आऊट करत टीम इंडियाला विजयाचे दार उघडे करुन दिले. अखेर टीम इंडियाने इंग्लंडचा पाच रनने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.

फायनल मॅचमध्ये रंगत वाढली, वाचा कसं आहे आजचं हवामान?

या विजेतेपदाबरोबरच महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आयसीसी विजेतेपदाचा हॅटट्रिक पूर्ण केली. त्यानंतर मागील आठ वर्षांमध्ये टीम इंडियाला एकाही आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. आता हा दुष्काळ संपवत नवा इतिहास रचण्याची संधी विराट कोहलीच्या टीमला बुधवारी आहे.

First published:

Tags: India vs england, On this Day, Virat kohli