NZ vs WI : न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सचा विक्रम, फक्त एवढ्या बॉलमध्ये ठोकलं शतक

NZ vs WI : न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सचा विक्रम, फक्त एवढ्या बॉलमध्ये ठोकलं शतक

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज (New Zealand vs West Indies) यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याने नवा विक्रम केला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज (New Zealand vs West Indies) यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये किवी टीमने 72 रनने विजय मिळवला. या मॅचमध्ये सिक्स आणि फोरचा पाऊस पडला. न्यूझीलंडचा बॅट्समन ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याने नवा विक्रम केला आहे. मॅचमध्ये 108 रनची खेळी करणारा ग्लेन फिलिप्स आता न्यूझीलंडकडून सगळ्यात जलद शतक करणारा खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम कॉलीन मुनरो याच्या नावावर होता.

ग्लेन फिलिप्स याच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 238-3 एवढा स्कोअर केला. न्यूझीलंडचा टी-20 क्रिकेटमधला हा तिसरा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी याच मैदानात न्यूझीलंडने वेस्टइंडिजविरुद्ध 2018 साली 5 विकेट गमावून 243 रन केल्या होत्या. तर न्यूझीलंडने ऑकलंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2018 सालीच 234-6 एवढा स्कोअर केला होता.

या मॅचमध्ये फिलिप्सने 51 बॉलमध्ये 108 रनची खेळी केली, यामध्ये 8 फोर आणि 10 सिक्स लगावले. फिलिप्ससोबत डेवॉन कॉन्वे (37 बॉलमध्ये नाबाद 64 रन) याने तिसऱ्या विकेटसाठी 184 रनची पार्टनरशीप केली. फिलिप्सने 46 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. याआधी मुनरोने 47 बॉलमध्ये टी-20 शतक केलं होतं.

न्यूझीलंडकडून सगळ्यात जलद टी-20 शतक

ग्लेन फिलिप्स- 46 बॉल- न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज- माऊंट मॉन्गनुई, 2020

कॉलिन मुनरो- 47 बॉल- न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज- माऊंट मॉन्गनुई, 2020

मार्टिन गप्टील- 49 बॉल- न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया- ऑकलंड, 2018

ब्रॅण्डन मॅक्कलम- 50 बॉल- न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, क्राईस्टचर्च, 2010

ऑकलंडमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा 5 विकेटने पराभव केला. दुसऱ्या टी-20 मध्येही विजय झाल्यामुळे न्यूझीलंडने तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. टी-20 सीरिज संपल्यानंतर दोन्ही टीम दोन टेस्ट मॅचची सीरिजही खेळणार आहेत.

Published by: Shreyas
First published: November 29, 2020, 12:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading