मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेट विश्वात दिसू लागला Dhoni Effect, आणखी एका दिग्गज कॅप्टन पद सोडणार!

क्रिकेट विश्वात दिसू लागला Dhoni Effect, आणखी एका दिग्गज कॅप्टन पद सोडणार!

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टनसी सोडल्यानंतर क्रिकेट विश्वातील आणखी एका दिग्गज कॅप्टननं पद सोडण्याचा इशारा दिला आहे.

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टनसी सोडल्यानंतर क्रिकेट विश्वातील आणखी एका दिग्गज कॅप्टननं पद सोडण्याचा इशारा दिला आहे.

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टनसी सोडल्यानंतर क्रिकेट विश्वातील आणखी एका दिग्गज कॅप्टननं पद सोडण्याचा इशारा दिला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 मार्च : आयपीएल 2022 ची सुरूवात होण्यापूर्वीच क्रिकेट विश्वात मोठी घटना घडली आहे. महेंद्रसिंह धोनीनी (MS  Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टनसी सोडली आहे. आता रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सीएसकेचा कॅप्टन असेल. धोनीनंतर क्रिकेट विश्वातील आणखी एका दिग्गज कॅप्टननं पद सोडण्याचा इशारा दिला आहे. हा कोणत्या आयपीएल टीमचा नाही तर आंतरराष्ट्रीय टीमचा कॅप्टन आहे.

इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं (Joe Root) कॅप्टनसी सोडण्याचे संकेत दिले आहेत. इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्या मालिकेतील तिसरी आणि शेवटची टेस्ट सुरू आहे. कॅप्टन म्हणून आपली ही शेवटची टेस्ट असू शकते, असे संकेत रूटनं दिले आहेत.

इंग्लंडच्या टेस्ट टीमची कामगिरी गेल्या काही महिन्यात निराशाजनक झाली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला अ‍ॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडचा मोठा पराभव झाला होता. या पराभवानंतर इंग्लंडचे कोच ख्रिस सिल्वरवूड यांना पद सोडावे लागले होते. सिल्वरवूड यांनी पद सोडल्यापासूनच रूटच्या कॅप्टनसीचे भवितव्य अधांतरी आहे. जो रूट 2017 पासून इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन आहे.

कधी देणार राजीनामा?

वेस्ट इंडिज विरूद्धच्या तिसऱ्या टेस्टपूर्वी रूटनं सांगितलं की, 'नवा कोच आल्यानंतर परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो. इंग्लंडची टीम पुढे नेण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे, असं मला वाटतं. पण, हेड कोच आल्यानंतर त्यांचे विचार वेगळे असतील तर ठीक आहे. तो त्यांचा निर्णय आहे. मी इंग्लड टीमचा सर्वात मोठा फॅन आहे. टीमनं चांगली कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे. मी या टीमला जगातील सर्वश्रेष्ठ टीम करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. माझे प्रयत्न कधीही थांबणार नाहीत.'

IPL 2022 : धोनीनं कॅप्टनसी सोडताच विराट भावुक, इमोशल पोस्ट शेअर करत म्हणाला...

रूटनं आजवर 116 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्याने 50 च्या सरासरीनं 9 हजार 884 रन केले आहेत. रूटच्या नावावर 53 अर्धशतक आणि 25 शतकांची नोंद आहे. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 5 द्विशतक देखील झळकावली आहेत. रूटनं 152 वन-डे आणि 32 टी20 मॅचमध्येही इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) दिग्गज क्रिकेटपटू पॉल कॉलिंगवुड यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी हंगामी कोच म्हणून नियुक्ती केली आहे. या दौऱ्यानंतर टीमला कायमस्वरूपी कोच मिळू शकतो.

First published:

Tags: Csk, England, Joe root, MS Dhoni