मुंबई, 14 फेब्रुवारी : आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) मुंबई इंडियन्सनं इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) तब्बल 8 कोटींमध्ये खरेदी केले. जोफ्रा गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. तसंच तो यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) खेळणार देखील नाही. त्यानंतरही मुंबईनं त्याच्यावर इतका पैसा खर्च केल्याबद्दल फॅन्समध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी आर्चरसाठी इतका पैसा का खर्च केला याचे कारण सांगितले आहे. ‘आर्चर आज जखमी आहे.पण तो फिट झाल्यानंतर जसप्रीत बुमरहाचा भक्कम जोडीदार असेल. आम्ही अनेक गोष्टींचा विचार केला. पहिल्या दिवशी ज्या पद्धतीनं फास्ट बॉलर्सची खरेदी झाली ते पाहता आमच्यासाठी जोफ्रा हा पर्याय होता. त्यामुळे आम्ही त्याच्या नावावर यापूर्वीच चर्चा केली होती,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या लिलावात आचर्र आणि इशान किशनशिवाय डॅनियल सॅम्सला 2.60 कोटी रुपयांना तिलक वर्माला 1.70 कोटी रुपयांना, संजय यादवला 50 लाख, मयंक मार्कंडेला 65 लाख, जयदेव उनाडकटला 1.30 कोटी रुपयांना, मुरुगन अश्विनला 1.60 कोटीला, बसील थंपीला 30 लाख, डेवाल्ड ब्रेविसला 3 कोटींना विकत घेतलं. याशिवाय मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्डला रिटेन केलं होतं. IPL Auction 2022 : वडिलांकडे नव्हते पैसे तर कोचनं केली मदत, इलेक्ट्रिशियनचा मुलगा झाला करोडपती मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी