मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2022 : मेगा ऑक्शनमध्ये आत्तापर्यंत Unsold असलेल्या खेळाडूंचं काय होणार?

IPL Auction 2022 : मेगा ऑक्शनमध्ये आत्तापर्यंत Unsold असलेल्या खेळाडूंचं काय होणार?

इंडियन प्रीमियर लीग 2002 च्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंची लॉटरी लागली. तर काहींना कुणीही खरेदी केले नाही.

इंडियन प्रीमियर लीग 2002 च्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंची लॉटरी लागली. तर काहींना कुणीही खरेदी केले नाही.

इंडियन प्रीमियर लीग 2002 च्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंची लॉटरी लागली. तर काहींना कुणीही खरेदी केले नाही.

मुंबई, 13 फेब्रुवारी :  इंडियन प्रीमियर लीग 2002 च्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंची लॉटरी लागली. तर काहींना कुणीही खरेदी केले नाही. ऑक्शन सुरू झाल्यानंतर पहिल्या 2 तासांमध्ये खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्वच टीममध्ये चढाओढ होती. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या टीमनं लंचपर्यंत एकालाही खरेदी केले नाही. त्यांनी लंचनंतर खेळाडूंवर मोठी बोली लावली.

चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) पहिल्या सिझनपासून असलेल्या अनुभवी सुरेश रैनावर (Suresh Raina) मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी कुणीही बोली लावली नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथलाही (Steve Smith)  पहिल्या दिवशी निराशा सहन करावी लागली. हे दोघेही यापूर्वी वेगवेगळ्या आयपीएल टीमचे कॅप्टन होते. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा बॅटर डेव्हिड मिलरलाही (David Miller) पहिल्या दिवशी कुणी खरेदी केले नाही.

अनसोल्ड खेळाडूंचे काय होणार?

ऑक्शनच्या पहिल्या दिवशी अनसोल्ड असलेल्या खेळाडूंवर आज (रविवार) पुन्हा एकदा बोली लागू शकते. या सर्व खेळाडूंचा  एक्सलरेटर ऑक्शनमध्ये समावेश होतो. त्याचबरोबर एखाद्या फ्रँचायझीची लिस्ट पूर्ण झाली नाही अनसोल्ड प्लेयर्सचा त्या फ्रँचायझी टीममध्ये समावेश करू शकतात. पण, त्यावेळी त्यांना त्या खेळाडूंच्या बेस प्राईज इतकी रक्कम देणे भाग आहे. त्याचबरोबर स्पर्धेसाठी उपलब्ध नसलेल्या किंवा जखमी खेळाडूंच्या बदली देखील अनसोल्ड खेळाडूंशी फ्रँचायझी करार करू शकतात.

ऋतुराज मिळाला पण दुसरा पुणेकर धोनीच्या हातातून सटकला, SRH च्या मालकिणीने लावली इतकी बोली

अनसोल्ड खेळाडूंची यादी

सुरेश रैना

डेव्हिड मिलर

स्टीव्ह स्मिथ

मॅथ्यू वेड

शाकिब अल हसन

ऋद्धिमान साहा

सॅम बिलिंग्स

उमेश यादव

आदिल रशीद

मुजीब उर रहमान

इम्रान ताहीर

अ‍ॅडम झम्पा

First published:

Tags: Cricket news, Ipl 2022 auction, Steven smith, Suresh raina