जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा 'तो' निर्णय ठरणार महाग, 6 कोटींच्या खेळाडूनं वाढवली डोकेदुखी

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा 'तो' निर्णय ठरणार महाग, 6 कोटींच्या खेळाडूनं वाढवली डोकेदुखी

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा 'तो' निर्णय ठरणार महाग, 6 कोटींच्या खेळाडूनं वाढवली डोकेदुखी

आयपीएल 2022 (IPL 2022) साठी मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 5 वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) या लिलावापूर्वी काळजी वाढली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी : आयपीएल 2022 (IPL 2022) साठी मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 5 वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) 4 खेळाडूंना रिटेन केले आहे.  यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांचा समावेश आहे. यामध्ये पोलार्डला 6 कोटी रूपये देत मुंबईनं रिटेन केले आहे. पोलार्डचा फिटनेस हा काळजीचा विषय बनल्यानं मुंबईची डोकेदुखी वाढली आहे. भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये पोलार्ड फिटनेसच्या कारणामुळे खेळला नाही. पोलार्ड जखमी असल्यानं महत्त्वाची मॅच न खेळल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. यापूर्वी तो डिसेंबर महिन्यांत वेस्ट इंडिज टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. त्या दौऱ्यावर तो गेला नव्हता. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यानही पोलार्ड दुखापतीनं त्रस्त होता. त्यामुळे तो बांगलादेश विरूद्धच्या मॅचमध्ये रिटायर हर्ट झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून सतत दुखापतग्रस्त असलेल्या पोलार्डला रिटेन करत मुंबई इंडियन्सनं चूक केली का हा प्रश्न पडला आहे. पोलार्ड गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईसोबत आहे. मुंबईच्या पाचही विजेतेपदात त्याचे मोलाचे योगदान आहे. तो टीममधील महत्त्वाचा ऑल राऊंडर असून रोहितच्या अनुपस्थितीमध्ये कॅप्टनसी देखील करतो. या सर्व कारणांचा विचार करत त्याला मुंबईने रिटेन केले आहे. IPL Auction 2022 : भारतीय खेळाडूनं वाढवली लिलावातील चुरस, 3 टीम लावणार मोठी बोली 34 वर्षांच्या पोलार्डने सर्वात जास्त 578 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 11 हजारांपेक्षा जास्त रन आणि 304 विकेट्स घेतल्या आहेत. तो या प्रकारतील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. आयपीएल 2022 स्पर्धेच्या दरम्यान तो पुन्हा एकदा जखमी झाला तर मुंबईच्या वाटचालीवर परिणाम होऊ शकतो. कारण, मुंबईनं यापूर्वीच हार्दिक पांड्या हा ऑल राऊंडर सोडला आहे. त्यामुळे पोलार्डवर टीमची मोठी भिस्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात