मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मंदीत चांदी! नव्या IPL टीमची किंमत वाचून व्हाल थक्क, BCCI ला मिळणार ‘इतके’ कोटी

मंदीत चांदी! नव्या IPL टीमची किंमत वाचून व्हाल थक्क, BCCI ला मिळणार ‘इतके’ कोटी

जगातील सर्वीत मोठ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर बीसीसीआयची (BCCI) आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. सध्याच्या मंदीच्या काळातही आयपीएलमुळे बीसीसीआय मालामाल होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 जून: जगातील सर्वीत मोठ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर बीसीसीआयची (BCCI) आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात मंदीचं वातावरण आहे. अनेक देशांच्या क्रिकेट बोर्डानी खेळाडूंचे वेतन कमी केले आहे. त्याचवेळी बीसीसीआयनं कोणतीही वेतनकपात केलेली नाही. याचे कारण म्हणजे बीसीसीआच्या तिजोरीत भरपूर पैसा आहे. सध्याच्या मंदीतही बीसीसीआयची मोठी आर्थिक कमाई होणार आहे. आयपीएलच्या आगामी सिझनमध्ये (IPL 2022) बीसीसीआय दोन नव्या टीमचा समावेश करणार आहे. त्याची किंमत सर्वसामान्यांना थक्क करणारी आहे.

'क्रिकबझ'च्या रिपोर्टनुसार आयपीएलमधील दोन नव्या टीमचा लिलाव जुलै महिन्यात होणार आहे. या नव्या टीमची किमान किंमत (base price) 1800 कोटी रुपयांच्या आसपास असेल. तर लिलावाच्या दरम्यान ती 2200 ते 2900 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन टीमच्या आयपीएलमधील प्रवेशानंतर बीसीसीआय मालामाल होईल. पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची (MI) 2700 ते 2800 कोटी, चेन्नई सुपर किंग्सची (CSK) 2200 ते 2300 कोटी तर राजस्थान रॉयल्सची किंमत 1855 कोटी आहे.

कोरोना काळात प्रेक्षकांनी भरलेल्या मैदानात पंतनं लुटला Euro चा आनंद, पाहा PHOTOS

कोणत्या 2 टीमचा समावेश होणार?

IPL 2022 मध्ये अहमदाबादची टीम असण्याची दाट शक्यता आहे. अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे. आयपीएल 2021 च्या काही लढती या स्टेडियमवर झाल्या आहेत. त्याचबरोबर गुजरात लॉयन्स ही टीम यापूर्वी आयपीएलचा भाग होती. दुसऱ्या शहरासाठी पुणे आणि लखनऊ या दोन शहरांमध्ये चुरस आहे. यामध्ये पुण्याची यापूर्वी आयपीएल टीम होती. तर लखनऊमध्ये नवे आंतरराष्ट्रीय स्टेडियम तयार झाले असून तिथं काही आंतरराष्ट्रीय सामने देखील झाले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशीतील पहिली आयपीएल टीम पुढील वर्षी खेळण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: BCCI, Cricket news, Ipl, Sports