मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: CSK विरुद्ध गब्बरचा मोठा रेकॉर्ड! विराट कोहलीला टाकलं मागं

IPL 2021: CSK विरुद्ध गब्बरचा मोठा रेकॉर्ड! विराट कोहलीला टाकलं मागं

 या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) सुरुवात जोरदार केली आहे. टीम इंडियाचा (Team India) गब्बर म्हणून प्रसिद्ध असलेला शिखर धवननं (Shikhar Dhawan) या मॅचमध्ये एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 11 एप्रिल : या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) सुरुवात जोरदार केली आहे. मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्लीनं चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सात विकेट्सनं पराभव केला. टीम इंडियाचा (Team India) गब्बर म्हणून प्रसिद्ध असलेला शिखर धवननं (Shikhar Dhawan) या मॅचमध्ये एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

धवननं मागील आयपीएलमधील फॉर्म या सिझनमध्येही कायम ठेवला. त्यानं दिल्लीकडून सर्वात जास्त 85 रन काढले. धवननं हे रन 54 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं काढले. यावेळी  आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 600 फोर मारणारा धवन हा पहिला बॅट्समन ठरला आहे. धवननं 171 आयपीएल इनिंगमध्ये 601 फोर लगावले आहेत. या यादीमध्ये डेव्हिड वॉर्नर (David Warner) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 142 इनिंगमध्ये 510 फोर लगावले आहेत.

विराटला टाकलं मागे

शिखर धवननं या खेळीच्या दरम्यान आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) देखील मागं टाकलं आहे. धवन आता चेन्नई विरुद्ध सर्वात जास्त रन करणारा बॅट्समन बनला आहे. त्यानं चेन्नई विरुद्ध 910 रन काढले आहेत. विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 901 रन आहेत.

पृथ्वी शॉ- शिखर धवन जोडीनं चेन्नई विरुद्ध पहिल्या विकेटसाठा 138 रनची पार्टरनरशिप केली. धववनं 54 बॉलमध्ये 85 रन काढले. यामध्ये 10 फोर आणि 2 सिक्सचा समावेश आहे. दिल्लीसाठी त्यांच्या ओपनिंग बॅट्समननं 2016 नंतर पहिल्यांचा 100 पेक्षा जास्त रनची पार्टरनरशिप केली आहे. तर दिल्लीच्या दोन्ही ओपनिंग बॅट्समननी हाफ सेंच्युरी झळकावण्याचा योग 2015 नंतर शनिवारी प्रथमच आला.

IPL 2021: भारताच्या 2 टीम जगावर राज्य करतील, माजी कॅप्टनची भविष्यवाणी )

आयपीएलच्या मागच्या मोसमात दिल्लीची टीम फायनलपर्यंत पोहोचली होती, पण अंतिम सामन्यात त्यांचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला होता. दिल्लीची पुढील मॅच आता राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध 15 एप्रिल रोजी होणार आहे.

First published:

Tags: IPL 2021, Shikhar dhavan, Virat kohli