जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: ख्रिस मॉरीसच्या फटकेबाजीमुळं राजस्थान विजयी, फॅन्सनी शोधलं 'Mirzapur कनेक्शन'

IPL 2021: ख्रिस मॉरीसच्या फटकेबाजीमुळं राजस्थान विजयी, फॅन्सनी शोधलं 'Mirzapur कनेक्शन'

IPL 2021: ख्रिस मॉरीसच्या फटकेबाजीमुळं राजस्थान विजयी, फॅन्सनी शोधलं 'Mirzapur कनेक्शन'

ख्रिस मॉरीस (Chris Morris) राजस्थानला विजय मिळवून देताच सोशल मीडियावर (Social Media) ‘मिर्झापूर’ (Mirzapur) या वेब सिरीजचे मीम्स व्हायरल (Viral) झाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 एप्रिल: आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) पहिल्याच आठवड्यात चुरशीचे सामने पाहयला मिळत आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Rajasthan Royals vs Delhi Capitals) यांच्यात गुरुवारी मुंबईमध्ये झालेली मॅच देखील शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगली. या मॅचमध्ये डेव्हिड मिलरनं (David Miller) अर्धशतक झळकावून राजस्थानच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरीस (Chris Morris) या मॅचचा हिरो ठरला. मॉरीसनं फक्त 18 बॉलमध्ये 36 रनची खेळी करत राजस्थान रॉयल्सला 2 बॉल आणि 3 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. यामध्ये 4 सिक्सचा समावेश आहे.टॉम करनला शेवटच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर सिक्स लगावत मॉरीसनं राजस्थानच्या विजयावर शिक्कमोर्तब केलं. मॉरीसनं राजस्थानला विजय मिळवून देताच सोशल मीडियावर (Social Media) ‘मिर्झापूर’ (Mirzapur) या वेब सिरीजचे मीम्स व्हायरल (Viral) झाले आहे. मॉरीसच्या खेळीचं मिर्झापूर कनेक्शन क्रिकेट फॅन्सनी शोधून काढलं आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये  राजस्थानला शेवटच्या दोन बॉलवर विजयासाठी 5 रनची गरज होती, तेव्हा त्यांचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) आणि ख्रिस मॉरिस मैदानात होते, पण संजू सॅमसननं मॉरिसला स्ट्राईक दिला नाही. संजूच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या मॉरीसचा चेहरा सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. त्यानंतरच्याच मॅचमध्ये मॉरीसनं फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. त्यामुळे त्याच्या या खेळीवर ‘मिर्झापूर’ मधील प्रसंगांचे मीम व्हायरल झाले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने देखील यामध्ये योगदान दिलं आहे.

null

null

null

null

null

null

ख्रिस मॉरीसला राजस्थान रॉयल्सनं 16.25 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. त्यानं गुरुवारी निर्णयाक क्षणी जबरदस्त खेळ करत राजस्थान रॉयल्सनं त्याच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात