अहमदाबाद, 28 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) ही मंगळवारी झालेली मॅच चांगलीच रंगतदार झाली. आरसीबीनं अगदी शेवटच्या बॉलवर दिल्ली कॅपिटल्सचा 1 रननं पराभव केला. या मॅचच्या दरम्यान ICC चा एक नियम मोडल्याची देखील घटना घडली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा बॉलर अमित मिश्रा (Amit Mishra) यानं ही नियमबाह्य कृती केली. त्यामुळे त्याला अंपायरनं पहिली वॉर्निंग दिली आहे.
दिल्लीच्या इनिंगमधील सातव्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ही आरसीबीची जोडी बॅटींग करत होती. या ओव्हरचा पहिला बॉल टाकण्यापूर्वी मिश्रानं बॉलला लाळ (saliva) लावली. कोरोना व्हायरसनंतर आयसीसीनं केलेल्या नियमानुसार बॉलला लाळ लावण्यास बंदी आहे.
अमित मिश्राची ही कृती पाहताच अंपायरनं त्याला बॉल टाकण्यापासून रोखलं. तो बॉल सॅनिटाईझ करण्यात आला. त्यानंतर खेळ सुरु झाला. या नियमबाह्य कृतीबद्दल अंपायरनं मिश्राला समज देखील दिली. दिल्ली कॅपिटल्सच्या या अनुभवी बॉलरनं आरसीबीविरुद्ध 27 रन देत ग्लॅन मॅक्सवेलची विकेट घेतली.
दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 14 रनची गरज होती, पण मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) 12 रन देऊन बँगलोरचा विजय निश्चित केला. ऋषभ पंतने 48 बॉलमध्ये नाबाद 58 रन तर शिमरन हेटमायरने 25 बॉलमध्ये नाबाद 53 रन केले. बँगलोरकडून हर्षल पटेलला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराज आणि काईल जेमिसनला एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
IPL 2021: 'भारतामध्ये सुरक्षित वाटत नव्हतं', आयपीएल सोडणाऱ्या खेळाडूची टीका
दिल्लीविरुद्धच्या या विजयासह बँगलोर पॉईंट्स टेबलमध्येही पहिल्या क्रमांकावर गेली आहे. विराटच्या टीमने 6 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, तर दुसरीकडे दिल्लीची टीम 6 सामन्यात 4 विजय आणि 2 पराभवांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit mishra, Cricket, Delhi capitals, Icc, IPL 2021, Sports