मुंबई, 18 एप्रिल: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) प्रमुख ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंडला रवाना झाला आहे. स्टोक्सला राजस्थानच्या पहिल्या मॅचमध्ये हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धेतून आऊट झाला आहे. राजस्थान रॉयल्सनं स्टोक्सला रविवारी भावुक निरोप दिला.
राजस्थाननं स्टोक्सला इंग्लंडला जाण्यापूर्वी त्याचे वडील गेरार्ड स्टोक्स यांच्या नावाची जर्सी दिली. गेरार्ड यांचं मागच्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. ही जर्सी पाहताच स्टोक्सला वडिलांची आठवण झाली, आणि तो त्या आठवणीनं हळवा झाला. स्टोक्सच्या हाताचं 19 एप्रिल रोजी ऑपरेशन होणार आहे. त्यानंतर त्याला 12 आठवडे क्रिकेटपासून दूर राहवं लागणार आहे. जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हा राजस्थानचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू दुखापतीमुळे अजून राजस्थानच्या टीममध्ये दाखल झालेला नाही. त्यापूर्वीच स्टोक्स देखील दुखापतीमुळे स्पर्धा सोडून इंग्लंडला गेल्यानं राजस्थानला धक्का बसला आहे.
बेन स्टोक्स आता आयपीएलसह जूनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या दोन टेस्टची मालिका आणि श्रीलंका विरुद्ध 23 जून ते 4 जुलै या काळात होणारी मर्यादीत ओव्हर्सच्या मालिका (वन-डे आणि टी20) खेळू शकणार नाही. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजपूर्वी तो फिट होण्याची शक्यता आहे.
Bye, Ben.
The all-rounder flew back home last night after a scan revealed that he'll have to undergo surgery on his finger. Speedy recovery, champ. #HallaBol | #RoyalsFamily | @benstokes38 pic.twitter.com/o1vRi5iO95 — Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 17, 2021
स्टोक्सच्या वडिलांचं ब्रेन कॅन्सरनं निधन
ब्रेन स्टोक्सचे वडिल मागच्या वर्षी कॅन्सर विरुद्धची लढाई हरले. गेरार्ड स्टोक्स यांना जानेवारी 2020 मध्ये कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. वडिलांच्या आजारपणामुळे स्टोक्स इंग्लंडची मालिका अर्धवट सोडून न्यूझीलंडला रवाना झाला होता. त्यानंतर मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्येही तो उशीरा दाखल झाला होता. वडिलांच्या कॅन्सरबद्दल माहिती झाल्यानंतर आठवडाभर झोपू शकलो नाही, असा खुलासा स्टोक्सनं केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ben stokes, Cricket news, Emotional, IPL 2021, Jofra archer, Rajasthan Royals, Sports