• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 संपताच मुंबईच्या खेळाडूची किचनमध्ये ड्यूटी, पाहा त्यानं कोणता पदार्थ केला तयार

IPL 2021 संपताच मुंबईच्या खेळाडूची किचनमध्ये ड्यूटी, पाहा त्यानं कोणता पदार्थ केला तयार

आयपीएल स्पर्धा अचानक थांबवण्यात आल्यानं खेळाडूंना आता मोकळा वेळ मिळाला आहे.मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यानं हा मोकळा वेळ स्वयंपाक घरात (kitchen) घालवला.

 • Share this:
  मुंबई, 2021: आयपीएल 2021 (IPL 2021) ही स्पर्धा कोरोना उद्रेकामुळे मंगळवारी स्थगित झाली. कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) 2 तर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) प्रत्येकी एक खेळाडूला तसंच चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्यानं बीसीसीआयला (BCCI) स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयपीएल स्पर्धा अचानक थांबवण्यात आल्यानं खेळाडूंना आता मोकळा वेळ मिळाला आहे. हा मोकळा वेळ ते घरच्यांसोबत घालवत आहेत. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यानं हा मोकळा वेळ स्वयंपाक घरात (kitchen) घालवला. हार्दिकची वहिनी आणि कृणाल पांड्याची (Krunal Pandya)  बायको पंखुडी शर्मा (Pankhuri Sharma) हिनं हार्दिकचा मॅगी तयार करत असलेला फोटो शेअर केला आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे मुंबई इंडियन्सचे खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान त्यांच्या पत्नीसोबतच होते.  हार्दिकची पत्नी नताशानं (Natasa Stankovic)  काही दिवसांपूर्वी त्यांच्या डान्सचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून त्याला 'द पांड्या स्वॅग' (The Pandya's Swag) असं नाव दिलं  होतं. या व्हिडीओमध्ये पांड्या ब्रदर्श, नताशा आणि पंखुडी यांनी एक सारखे कपडे घालून डान्स केला होता.
  कोरोना संक्रमणामुळे आयपीएल स्पर्धेतील 60 पैकी 29 मॅच झाल्यानंतर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यामुळे मुंबई इंडियन्स टीमसोबत असलेले पांड्या ब्रदर्स आता घरी परतणार आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: