मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021, MI vs RCB: बाबा आऊट होताच रागावला डिविलियर्सचा मुलगा, ज्युनिअर ABD चा Video Viral

IPL 2021, MI vs RCB: बाबा आऊट होताच रागावला डिविलियर्सचा मुलगा, ज्युनिअर ABD चा Video Viral

क्रिकेट विश्वात मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्स (AB De Villers) जास्त रन करता आले नाहीत. तो फक्त 11 रन काढून आऊट झाला. तो आऊट होताच निराश झालेल्या त्याच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

क्रिकेट विश्वात मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्स (AB De Villers) जास्त रन करता आले नाहीत. तो फक्त 11 रन काढून आऊट झाला. तो आऊट होताच निराश झालेल्या त्याच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

क्रिकेट विश्वात मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्स (AB De Villers) जास्त रन करता आले नाहीत. तो फक्त 11 रन काढून आऊट झाला. तो आऊट होताच निराश झालेल्या त्याच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दुबई, 27 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेचा सेकंड हाफ (IPL 2021, Second Phase) सध्या यूएईमध्ये सुरू आहे. या स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात मॅच झाली. या मॅचमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमनं मुंबई इंडियन्सचा 54 रननं पराभव केला. यूएईमध्ये सलग 7 मॅच गमावल्यानंतर आरसीबीला हा विजय मिळाला आहे. या विजयात कॅप्टन विराट कोहलीच्या (51) आणि ग्लेन मॅक्सवेल (56) यांचा मोलाचा वाटा होता. पण, क्रिकेट विश्वात मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्स (AB De Villers) जास्त रन करता आले नाहीत. तो फक्त 11 रन काढून आऊट झाला.

डिविलियर्स खेळ पाहण्यासाठी त्याची पत्नी डॅनिएल आणि मुलंही मैदानात उपस्थित होते. त्याच्या कुटुंबियासह फॅन्सनाही डिविलियर्सकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्यानं बुमराहनं टाकलेल्या 17 व्या ओव्हरमध्ये एक सिक्स आणि फोर लगावत आक्रमक सुरुवात केली होती. पण पुढच्या ओव्हरमध्ये बुमरहानं याचा बदला घेतला. त्यानं सलग बॉलवर मॅक्सवेल आणि डीव्हिलियर्सला आऊट केलं.

RCB vs MI : विराट ठरला रोहितवर भारी, मुंबई इंडियन्स हरली पुन्हा दुबईच्या दारी!

बुमराहचा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बॉलवर डिविलियर्स अप्पर कट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बॅटच्या कडेला लागलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डिविलियर्स आऊट होताच ही मॅच पाहत असलेला त्याचा मुलगा निराश झाला. त्यानं रागाच्या भरात खुर्चीवर जोरानं हात मारला. त्यावेळी लगेच त्याची आई डेनिएलनं त्याचा हात पकडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

बंगळुरूचा मुंबईवर विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 54 रननं विजय मिळवत यूएईमधील पराभवाची साखळी तोडली आहे. मुंबईकडून  रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रोहितने सर्वाधिक ४३ रन्स केले. तर क्विंटन डी कॉक 24 रन्स केले. या दोघांनी केलेल्या चांगल्या सुरुवातीचा मुंबईला फायदा उठवता आला नाही.

POINTS TABLE:

आरसीबीकडून हर्षल पटेल (Harshal Patel) सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 4 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड आणि राहुल चहर यांना सलग तीन बॉलवर आऊट करत हर्षलनं हॅट्ट्रिक घेतली. या विजयानंतर आरसीबीचे 12 पॉईंट्स झाले असून 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याच्या त्यांच्या आशा वाढल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

First published:

Tags: IPL 2021, RCB