जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: उडता संजू! शिखर धवनचा घेतला अफलातून कॅच, सहकारी झाले स्तब्ध

IPL 2021: उडता संजू! शिखर धवनचा घेतला अफलातून कॅच, सहकारी झाले स्तब्ध

IPL 2021: उडता संजू! शिखर धवनचा घेतला अफलातून कॅच, सहकारी झाले स्तब्ध

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) यांच्यामध्ये गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) याने एक जबरदस्त कॅच पकडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) यांच्यामध्ये गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) याने एक जबरदस्त कॅच पकडला. जयदेव उनाडकतच्या (Jaidev Undakat) बॉलिंगवर संजूनं उजवीकडं झेपावत जबरदस्त कॅच घेतला. त्यानं घेतलेला हा कॅच आता चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. दिल्लीच्या इनिंगमधील चौथ्या ओव्हरमध्ये संजूनं हा कॅच घेतला. जयदेव उनाडकतच्या ऑफ साईडला जाणाऱ्या बॉलवर धवननं स्कूप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संजूनं उजवीकडं झेपावत कॅच पकडला. त्याचा हा कॅच पाहून सर्वांनाच धक्का बसला. शिखर धवन सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यानं पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. राजस्थान विरुद्ध संजूच्या सुंदर कॅचमुळे त्याला 9 रनवरच समाधान मानावं लागलं. यापूर्वी संजू सॅमसननं टॉस जिंकून दिल्लीला पहिल्यांदा बॅटींगचं आमंत्रण दिलं. दिल्लीची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 5 रन काढून आऊट झाला. जयदेव उनाडकतनं दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला आऊट केलं. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये उनाडकतच्याच बॉलवर संजू सॅमसननं धवनचा कॅच घेतला.

जाहिरात

या दोन धक्क्यांमधून दिल्लीची टीम सावरण्यापूर्वी जयदेवनं अनुभवी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला देखील पॉवर प्ले संपण्यापूर्वी आऊट करत या मॅचमधील तिसरी विकेट घेतली. रहाणेनंतर दिल्लीचा ऑल राऊंडर मार्कस स्टॉईनिस याला देखील फार काळ खेळता आलं नाही. मुस्तफिजूरनं त्याला शून्यावर आऊट करत दिल्लीला चौथा धक्का दिला.राजस्थान रॉयल्सच्या अचूक बॉलिंगमुळे दिल्लीची अवस्था 4 आऊट 37 अशी नाजूक झाली होती. दिल्ली कॅपिटल्सनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 147 रन केले. राजस्थान रॉयल्सनं हे आव्हान ख्रिस मॉरीसच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. मॉरीसनं फक्त 18 बॉलमध्ये नाबाद 36 रन काढले. त्यामुळे राजस्थाननं ही मॅच 2 बॉल आणि 3 विकेट्स राखून जिंकली. राजस्थान रॉयल्सची पुढील मॅच 19 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात