मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: सर्वात जास्त विकेट्स घेणारा भारतीय बॉलर म्हणतो,'आणखी काय करु?'

IPL 2021: सर्वात जास्त विकेट्स घेणारा भारतीय बॉलर म्हणतो,'आणखी काय करु?'

आयपीएलच्या इतिहासात अमित मिश्रा (Amit Mishra) हा लसिथ मलिंगा नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर  असला तरी भारतीय बॉलर्सच्या यादीत तो नंबर 1 आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू आपआपल्या टीममध्ये दाखल होत आहेत. लेग स्पिनर अमित मिश्रा (Amit Mishra) देखील दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीममध्ये दाखल झाला आहे. मिश्रावर संथ गतीनं बॉलिग केल्याची टीका करण्यात येते, त्यावर 'मी आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर आहे. त्यामुळे कुणी काय टीका करतं याचा मी विचार करत नाही,' असं त्यानं स्पष्ट केलं.

आयपीएलच्या इतिहासात अमित मिश्रा हा लसिथ मलिंगा नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर  असला तरी भारतीय बॉलर्सच्या यादीत तो नंबर 1 आहे. त्याने आजवर आयपीएलमध्ये 150 मॅचमध्ये 160 विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगाला मागं टाकण्यासाठी त्याला आणखी 11 विकेट्सची गरज आहे.

अमित मिश्रानं एका मुलाखीमध्ये सांगितलं, 'आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याच्या यादीत मी दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापेक्षा जास्त एखादा व्यक्ती काय करु शकतो. सर्वात अव्वल दर्जाच्या लीगमध्ये माझी कामगिरी अव्वल झालेली आहे. माझं काम हे चांगलं प्रदर्शन करणं हे आहे. मागच्या अनेक वर्षांपासून मी ते करत आहे. माझ्याबद्दल लोकं काय विचार करतात याचा मला फरक पडत नाही.'

View this post on Instagram

A post shared by Amit Mishra (@mishiamit)

( वाचा : IPL 2021: राहुल द्रविडचा एक सल्ला, आणि चेतेश्वर पुजाराची बॅटींग बदलली )

आयपीएलमधील सर्वात यशस्वी लेगस्पिनर या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाला की, ' मनगटाच्या साह्यानं बॉल स्पिन करणे ही एक अवघड कला आहे. त्यासाठी खूप अभ्यास करण्याबरोबरच कॅप्टनच्या पाठिंब्याची गरज असते. कोणत्याही लेग स्पिनरसाठी कॅप्टनचा पाठिंबा आवश्यक असतो. त्याच्या विरुद्ध रन होत असताना त्याला पाठिंबा देणारा, त्याचा आत्मविश्वास वाढवणारा कॅप्टन गरजेचा आहे.'

First published:

Tags: Delhi capitals, IPL 2021