मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : पंजाबनंतर राजस्थानही आयपीएलमधून बाहेर, कोलकात्याचा दणदणीत विजय

IPL 2020 : पंजाबनंतर राजस्थानही आयपीएलमधून बाहेर, कोलकात्याचा दणदणीत विजय

आयपीएल (IPL 2020)च्या प्ले-ऑफचं चित्र आता हळू हळू स्पष्ट व्हायला लागलं आहे. पंजाब (KXIP)नंतर आता राजस्थान (Rajasthan Royals)ही आयपीएल प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर झालं आहे. कोलकाता (KKR)विरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा 60 रनने पराभव झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 2 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या प्ले-ऑफचं चित्र आता हळू हळू स्पष्ट व्हायला लागलं आहे. पंजाब (KXIP)नंतर आता राजस्थान (Rajasthan Royals)ही आयपीएल प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर झालं आहे. कोलकाता (KKR)विरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा 60 रनने पराभव झाला आहे. त्यामुळे प्ले-ऑफच्या शर्यतीत आता 3 जागांसाठी बँगलोर, दिल्ली, कोलकाता आणि हैदराबाद या टीम राहिल्या आहेत. तर मुंबई आधीच प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झाली आहे.

कोलकात्याने ठेवलेल्या 192 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानची सुरुवात धडाक्यात झाली. पॅट कमिन्सच्या पहिल्याच ओव्हरच्या 5 बॉलला राजस्थानने 19 रन केले, पण कमिन्सने शेवटच्या बॉलवर उथप्पाची विकेट घेऊन राजस्थानला धक्के द्यायला सुरुवात केली. यानंतर राजस्थानचा डाव सावरला नाही. जॉस बटलरने 22 बॉलमध्ये 35 तर राहुल तेवतियाने 27 बॉलमध्ये 31 रन केले. कोलकात्याकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 2-2 आणि कमलेश नागरकोटीला 1 विकेट मिळाली.

या मॅचमध्ये राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता, यानंतर जोफ्रा आर्चरने नितीश राणाला शून्यवर आऊट केलं, पण शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठीने कोलकात्याचा डाव सावरला. तर इयन मॉर्गनने फटकेबाजी करुन कोलकात्याला 191 रनपर्यंत पोहोचवलं. मॉर्गनने 35 बॉलमध्ये 68 रन केले, तर गिलने 36 आणि त्रिपाठीने 39 रन केले.

प्ले-ऑफचं गणित

या सामन्यात मोठा विजय मिळवून कोलकात्याने आपलं प्ले-ऑफचं आव्हान अजून कायम ठेवलं आहे. कोलकात्याला आता प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर त्यांना आता इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. सोमवारी दिल्ली आणि बँगलोर यांच्यात होणाऱ्या सामन्यात दोन्ही टीमपैकी एका टीमला मोठ्या फरकाने हरावं लागेल सोबतच मंगळवारी हैदराबादने मुंबईचा पराभव केला, तरच कोलकाता प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवेल. रविवारच्या पहिल्या मॅचमध्ये चेन्नईने पंजाबचा पराभव केल्यामुळे पंजाबही प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाली.

राजस्थान शेवटच्या क्रमांकावर

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मोठा पराभव झाल्यामुळे राजस्थान यावर्षी पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहणार आहे. राजस्थानने 14 पैकी 6 सामने जिंकले आणि 8 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. राजस्थानएवढेच विजय पंजाब आणि चेन्नईचेही झाले, पण चांगल्या नेट रनरेटमुळे पंजाब सहाव्या, चेन्नई सातव्या आणि राजस्थान आठव्या क्रमांकावर राहिले.

First published: