जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 : कार्तिकचा तरुणाला लाजवेल असा भन्नाट कॅच, पाहा VIDEO

IPL 2020 : कार्तिकचा तरुणाला लाजवेल असा भन्नाट कॅच, पाहा VIDEO

IPL 2020 : कार्तिकचा तरुणाला लाजवेल असा भन्नाट कॅच, पाहा VIDEO

आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफच्या रेसमधून कोलकाता (KKR)ने राजस्थान (Rajasthan Royals) ला बाहेर काढलं आहे. या मॅचमध्ये दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ने अफलातून कॅच पकडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 2 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफच्या रेसमधून कोलकाता (KKR)ने राजस्थान (Rajasthan Royals) ला बाहेर काढलं आहे. कोलकात्याने राजस्थानवर 60 रनने दणदणीत विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये कोलकात्याचा विकेट कीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ने घेतलेला अफलातून कॅच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 35 वर्षांचा असलेल्या दिनेश कार्तिकने एखाद्या तरुणाला लाजवेल असा भन्नाट कॅच पकडला आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दिनेश कार्तिकला बॅटिंगमध्ये संघर्ष करावा लागला, तसंच त्याने टीमचं नेतृत्वही अर्ध्यातच सोडून दिलं, त्यामुळे इयन मॉर्गनला कर्णधार करण्यात आलं. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्येही कार्तिक शून्य रनवर आऊट झाला, पण त्याने बेन स्टोक्सचा अफाट कॅच पकडून मॅच कोलकात्याच्या बाजूने फिरवली.

जाहिरात

राजस्थानच्या टीमने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर कोलकात्याने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 191 रन केले. इयन मॉर्गनने 35 बॉलमध्ये केलेल्या 68 रनच्या नाबाद खेळीमुळे कोलकात्याला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. कोलकात्याच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानची सुरुवात धडाक्यात झाली. कमिन्सने टाकलेल्या पहिल्या 5 बॉलमध्येच त्यांनी 18 रन केले. यात स्टोक्सने त्याला एक फोर आणि एक सिक्स लगावली, पण शेवटच्या बॉलवर कमिन्सने जोरदार पुनरागमन करत राजस्थानला उथप्पाच्या रुपात पहिला धक्का दिला. यानंतर आपल्या पुढच्याच ओव्हरमध्ये कमिन्सने स्टोक्सलाही माघारी पाठवलं, पण कमिन्सपेक्षा ही विकेट दिनेश कार्तिकचीच म्हणावी लागेल, कारण त्याने अशक्य वाटणारा असा कॅच पकडला. कोलकात्याने दिलेल्या या धक्क्यातून राजस्थान सावरू शकली नाही, त्यांना 20 ओव्हरमध्ये 131 रनच करता आले, त्यामुळे राजस्थानचा 60 रनने पराभव झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात