मुंबई, 11 फेब्रुवारी : वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्होचा (Dwayne Bravo) जिवलग मित्र भारतामध्ये बेपत्ता झाला आहे. मित्र सापडत नसल्यानं निराश झालेल्या ब्राव्होनं इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून मदतीचं आावाहन केलं आहे. ब्राव्होनं मित्राची सविस्तर माहिती शेअर केली असून तो सापडल्यास इनबॉक्स करा, पोलिसांना कळवा किंवा वेस्ट इंडिज टीमला सांगा असं आवाहन केलं आहे.
ब्राव्होनं जो जिवलग मित्र हरवल्याची तक्रार केलीय तो अन्य कुणी नसून वेस्ट इंडिज टीमचा कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आहे. पोलार्ड स्वत: बेपत्ता नसून त्याचा फॉर्म हरवलाय. तो भारताविरूद्धच्या सीरिजमधील (India vs West Indies) पहिल्या मॅचमध्ये शून्यावर आऊट झाला. तर दुसऱ्या मॅचमध्ये दुखापतीमुळे खेळला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज टीम सध्या व्हाईट वॉशच्या उंबरठ्यावर उभी आहे.
पोलार्डला भारतीय पिचचा मोठा अनुभव असल्यानं तो या सीरिजमध्ये दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण, तसं प्रत्यक्षात झालं नाही. त्यामुळे ब्राव्होनं मजेदार पोस्ट लिहिली आहे. पोलार्डला पहिल्या मॅचमध्ये युजवेंद्र चहलनं क्लीन बोल्ड केले होते. तो संदर्भ घेत ब्राव्होनं पोलार्डची सर्व माहिती लिहिली असून तो शेवटी चहलच्या खिशात दिसला होता, अशी माहिती पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
ब्राव्होचे पोलार्डबद्दलचे ही पोस्ट चांगलेच व्हायरल झाले आहे. भारताचा फास्ट बॉलर धवल कुलकर्णी तसंच वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर फिडेल एडवर्ड यांनीही या पोस्टला हसण्याची इमोजी शेअर करत दाद दिली आहे.
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरी वन-डे आज (शुक्रवार) होणार आहे. पहिल्या दोन्ही वन-डेमध्ये वेस्ट इंडिजच्या बॅटींगनं निराशा केली. त्यांना 200 रनचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्याचा त्यांना फटका बसला. आता तिसऱ्या आणि शेवटच्या वन-डेमध्ये वेस्ट इंडिजला पराभव टाळण्यासाठी पोलार्डसह सर्वच बॅटर्सना कामगिरी उंचवावी लागणार आहे.
IPL Auction 2022 : प्रिती झिंटाला लिलावापूर्वी मोठा धक्का, टीमच्या कोचनं दिला राजीनामा
आयपीएल स्पर्धेत पोलार्ड मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सदस्य आहे. त्याला मुंबईनं 6 कोटींमध्ये रिटेन केले आहे. तर ब्राव्हो गेली अनेक सिझन चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा सदस्य होता. त्याला चेन्नईनं रिटेन केलेलं नसल्यानं तो यंदा लिलावासाठी उपलब्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram post, Kieron pollard, Social media