मोहाली, 5 मार्च : टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या टेस्टमध्ये सेंच्युरी (India vs Sri Lanka) झळकावली आहे. जडेजानं मोहाली टेस्टच्या दुसऱ्या दिवशी सेंच्युरी पूर्ण केली. टेस्ट करिअरमधील ही दुसरीच सेंच्युरी आहे. जडेजा दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही जाऊ शकला नव्हता. दुखापतीनंतर पहिल्याच टेस्ट इनिंगमध्ये जडेजानं शतक झळकावले. जडेजा पहिल्या दिवसाच्या अखेरीस 45 रनवर नाबाद होता. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी झटपट अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाचा दिग्गज स्पिनर आ. अश्विनसोबत (R. Ashwin) त्याची जोडी जमली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 130 रनची पार्टनरशिप केली. अश्विन 61 रन काढून आऊट झाला. यापूर्वी जडेजा - अश्विन जोडीनं टीम इंडियाला 450 रनचा टप्पा ओलांडून दिला होता.
'Rockstar' @imjadeja 👏👏@Paytm #INDvSL pic.twitter.com/JG25othE56
— BCCI (@BCCI) March 5, 2022
मोहालीमध्ये सुरू असलेली ही टेस्ट विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खास आहे. त्याच्या टेस्ट करिअरमधील ही 100 वी टेस्ट आहे. या टेस्टमध्ये स्पेशल खेळ करून विराटला भेट देण्याचा निर्धार कॅप्टन रोहित शर्मानं व्यक्त केला होता. पहिल्या दिवशी ऋषभ पंतनं 96 रनची आक्रमक खेळी केली होती. त्यानंतर जडेजानं शतक झळकावले.